Uddhav Thackeray, Narendra Modi
Uddhav Thackeray, Narendra Modi

Maratha reservation: मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधानांची घेणार भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते.
Published on

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. मागच्या महिन्यात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. "सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानपीठाने ५ मे २०२१ रोजी दिलेल्या निकालामुळे मला पत्र लिहिण्याची संधी मिळाली. माझ्या राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पावले उचलण्याची मी आपल्याला विनंती करतो. कायद्याला धरुन शैक्षणिक क्षेत्रात १२ टक्के आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १३ टक्के आरक्षण देण्याची विनंती त्यांनी पत्राद्वारे केली होती." (Maratha reservation Uddhav Thackeray to meet PM Modi in Delhi)

सर्वोच्च न्यायालयाने पाच मे रोजी दिलेल्या निकालात मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा रद्द केला होता. त्यानंतर मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे.

सध्या राज्य सरकारने आर्थिक दृबर्ल घटकातंर्गत मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. खासदार संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणावर एकमत घडवून आणण्यासाठी दौरा केला. मुंबईत येऊन त्यांनी शरद पवार, देवेंद्र फडणवीसांसह अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()