में यूपी से हू; मराठी नही आती...! मुंबई मेट्रोवनमधील कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, मराठी एकीकरण समितीकडून करेक्ट कार्यक्रम

Mumbai News: मुंबई मेट्रोवनमधील कर्मचाऱ्याला मराठी बोलता येत नसल्याचा त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी मुंबई मेट्रोवनला धारेवर धरलं आहे.
Mumbai Metro one viral video
Mumbai Metro one viral videoESakal
Updated on

मुंबईत मागील अनेक दिवसांपासून मराठी आणि इतर भाषिक यांच्यातील संघर्ष उफाळून येत असल्याचे पहायला मिळत आहे. मराठी भाषिकांना नो एन्ट्री असे फलक देखील मुंबईत काही कंपन्यांच्या कार्यालयाबाहेर झळकले होते. अशातच आता मुंबई मेट्रोवन मध्ये तिकीट खिडकीवर बसलेल्या कर्मचाऱ्याला मराठी भाषा येत नाही आणि तो तिकीट घेणाऱ्यांना बोलतो मी यूपी से हू... मुझे मराठी नाही आती... आप हिंदी मे बात करो... असं सांगत आहे. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यानंतर या व्हिडिओवर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हा व्हिडिओ मराठी एकीकरण समितीपर्यंत पोहोचला आहे. त्यानंतर आता मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत याचा जाब मेट्रो प्रशासनाला विचारला आहे. स्थानिक भाषेत सुविधा पुरवायच्या असताना नोकर भरतीत परप्रांतीय तरुणांना घेतलेच कसे? असा सवाल देखील मराठी एकीकरण समितीकडून विचारण्यात आला आहे.

Mumbai Metro one viral video
Rajan Teli: राजन तेली आमचेच! दिशाभूल झालेले अनेक जण परतणार; उद्धव ठाकरेंचं सूचक विधान

मेट्रो वनमधून प्रवास करत असताना मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना हा प्रकार अनुभवला आहे. यानंतर त्यांनी मेट्रो वन मधील कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचं या व्हिडिओमधून पाहायला मिळत आहे. मराठी एकीकरण समितीने याचा व्हिडिओ व्हायरल केला आहे.

या व्हिडिओत त्यांनी सांगितलं की, राज्यातल्या प्रकल्पावर परप्रांतीयांना रोजगार.. मुंबई मेट्रो ने महाराष्ट्र शासनाची फसवणूक केली आहे, मराठी भाषा अवगत असणे ही अट डावलून भाषा येत नसताना परप्रांतीयांना इथे नोकऱ्या दिल्या आहेत..मुंबई मेट्रो १ ने प्रवास करताना आलेला अनुभव.. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राज्याला सांगत होते असे प्रकल्प हे राज्यातील तरुणाना रोजगार देतात पण हे रोजगार तर परप्रांतीयांना दिले जातात त्याचे हे उत्तम उदाहरण. आपण नोकऱ्यासाठी वाट बघून आहोत, लाखो लोक बेरोजगार आहेत आणि शासन या नोकऱ्या परराज्यातील लोकांना देत आहे.

तिकीट काढणारे मुलं आपल्या राज्यात नाहीत..मराठी भाषा येत नसताना परराज्यातील लोकांना इथे शासनाच्या मेट्रो सारख्या प्रकल्पात नोकऱ्या दिल्या जातात.मेट्रो ने राज्य शासनाला अंधारात ठेवून भरती केली आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री आम्हा स्थानिकांना फसवत आहेत? आमच्या राज्याच्या प्रकल्पात या लोकांना नोकऱ्या कशा ? हे कर्मचारी तिकीट घेणाऱ्या ग्राहकांना भाषा शिकून या म्हणतात.. आपला मराठी माणूस दररोज तिकीट काढत असेल आणि हे सर्व सहन करतोय ??? जाब विचारत नाही? नागपूर, पुणे, मुंबई मेट्रो 3, महामेट्रो, इकडे हेच केलेलं आहे. आम्ही तर काल सहज कार सोडून मुंबई मेट्रो ने प्रवास करताना हे दिसून आले, वाटलं उत्तरप्रदेशात आहोत. असे किती लोकांनी आमचे रोजगार हिसकवले आहेत?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.