Mumbai: मुंबईत मराठी पाट्यांशिवाय पर्यायच नाही! 'मनपा'ने लावला कारवायांचा सपाटा

दोषी दुकाने अथवा आस्थापनांमध्ये कार्यरत प्रतिव्यक्ती दोन हजार रुपये आणि सातत्याने नियमभंग केल्याचे आढळल्यास प्रतिदिन रुपये दोन हजार याप्रमाणे दंड केला जात असल्याचे पालिकेच्‍या वतीने स्‍पष्‍ट केले आहे.
marathi pati mumbai
marathi pati mumbai Esakal
Updated on

Marathi Pati Mumbai: दुकाने आणि आस्थापनांवर मराठी पाट्या न लावणाऱ्या व्‍यापाऱ्यांवर पालिकेने कारवाईचा जोर वाढवला आहे. २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत तब्बल २० हजार ९२३ दुकाने व आस्थापनांची पाहणी करून एक हजार ९६ दुकानांवर देवनागरी लिपीत मराठी पाट्या नसल्याने कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाने दिली.

मुंबईत सात लाखांहून अधिक दुकाने व आस्थापना आहेत. प्रत्येक दुकानाच्या प्रवेशद्वारावर देवनागरी लिपीत मराठी पाट्या लावणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) नियम, २०१८ व महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम, २०२२ च्या अनुक्रमे नियम ३५ व कलम ३६ कच्या तरतुदींनुसार आस्थापनांचे नामफलक मराठी देवनागरी लिपीत, ठळक अक्षरात असणे बंधनकारक आहे.

marathi pati mumbai
Mumbai Pune Highway : मुंबई-पुणे महामार्ग आज जड वाहनांसाठी २ तास बंद

सर्वोच्च न्यायालयाने मराठीत पाट्या लावण्याबाबत दोन महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत २५ नोव्‍हेंबरला संपुष्टात आली. या पार्श्‍वभूमीवर पालिकेने २८ नोव्‍हेंबरपासून न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी सुरू केली आहे. कारवाईसाठी २४ विभागांत दुकाने व आस्थापना खात्यातील वरिष्‍ठ अधिकाऱ्यांचे पथक स्थापन केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि कायद्यातील तरतुदींचा भंग करणाऱ्या दुकानदारांना सर्वप्रथम तपासणीपत्र सोपवण्यात येत आहे. त्यानंतर दोषी दुकाने अथवा आस्थापनांमध्ये कार्यरत प्रतिव्यक्ती दोन हजार रुपये आणि सातत्याने नियमभंग केल्याचे आढळल्यास प्रतिदिन रुपये दोन हजार याप्रमाणे दंड केला जात असल्याचे पालिकेच्‍या वतीने स्‍पष्‍ट केले आहे.

marathi pati mumbai
Mumbai Metro : कल्याण तळोजा मेट्रो कामास गती; बांधकामासाठी 1 हजार 877 कोटींची निविदा जाहीर

मराठी पाट्यांची स्थिती

ठिकाण - पाहणी - अंमलबजावणी - कारवाई

कुलाबा/ए - ७७ - ७४ - ३

सँडहर्स्ट रोड/बी - ८५ - ८१ - ४

चंदनवाडी/सी - १२७ - ११६ - ११

ग्रँट रोड/ डी - ९५ - ७९ - १६

भायखळा/ ई - ९५ - ८८ - ७

परळ/ एफ दक्षिण - १३५ - १२२ १३

माटुंगा/उत्तर - २४३ - २३५ - ८

वांद्रे/एच पूर्व - २३७ - २३४ - ३

अंधेरी/के पूर्व - २७८ - २७१ - ७

मालाड/ पी उत्तर - १५३ - १५० - ३

गोरेगाव/पी दक्षिण - १४१ - १३८ ३

दहिसर/आर मध्‍य - २२० - २१० - १०

घाटकोपर/एन - १४६ - १४१ - ५

भांडुप/एस ९८ - ८८ - १०

मुलुंड टी ८९ - ८३ - ६

२८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यानची कारवाई

तपासणी : २०,९२३

मराठीत पाट्या : १९,८२७

कायदेशीर कारवाई : १,०९६

marathi pati mumbai
Mumbai : शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांना केले राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.