Mumbai News : कबूतरांना दाणे टाकणा-यांवर आता मार्शलचा वॉच

मुंबईत प्रदुषण वाढत आहे, प्रदुषण रोखण्यासाठी मार्शल नेमले आहेत. आता कबूतराना दाणे टाकल्यामुळे होणारा उपद्रव, प्रदुषण आणि आजार वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.
pigeon eating
pigeon eatingsakal
Updated on

मुंबई - मुंबईत प्रदुषण वाढत आहे, प्रदुषण रोखण्यासाठी मार्शल नेमले आहेत. आता कबूतराना दाणे टाकल्यामुळे होणारा उपद्रव, प्रदुषण आणि आजार वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कबूतरांना दाणे टाकणा-यांवर आता मार्शलचा वॉच राहणार आहे. १०० ते ५०० रुपयांपर्यंतचा दंडाची कारवाई होणार आहे.

मुंबईत गेल्या महिन्यांपासून प्रदूषणाचा धोका वाढला आहे. प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने उपाययोजना आखून त्याची कठोपणे अंमलबजावणी केली जाते आहे. यात आता अनधिकृतपणे कबुतरांना खाद्य टाकणार्‍यांवरही कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मुंबईत दादर, माहीम, फोर्ट, माटुंगा अशा ठिकाणी कबुतरखाने आहेत. हे कबुतरखाने अनेकवर्षासून सुरु आहेत.

तसेच मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरातही अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे कबुतरांना चणे, डाळ असे खाद्य घालणे सुरू आहे. याचा उपद्रव होत असल्याने परिसरातील नागरिक हैराण आहेत. यावर रहिवाशांनी आक्षेप घेत तक्रारी केल्या आहेत. मात्र तरीही कोणतीही कारवाई झालेली नसल्याने रहिवाशांना हा त्रास सहन करावा लागतो आहे.

कबुतरांच्या विष्ठेमुळे अनेक आजार होतात. कबुतर्‍यांचे थवे उडताना उडणारी धूळ, खाद्याची घाण, पिसे आणि दुर्गंधीमुळे परिसरात प्रदुषणात भर पडते. ही बाब लक्षात घेऊन बेकायदेशीरपणे कबुतरांना खाद्य टाकणार्‍यांवर पालिकेने कारवाईचा निर्णय घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.