Mumbai : उन्हाळ्यात माथेरानची राणी सुसाट! अवघ्या तीन महिन्यात मध्य रेल्वेची १.०१ कोटींची कमाई!

Central Railway
Central Railway
Updated on

मुंबई : पर्यटकांचे खास आकर्षण असणारी माथेरानची राणी असलेली मिनीट्रेनला पर्यटकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन महिन्यात माथेरानच्या राणीतून १.३१ लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यामधून १.०१ कोटीं रुपयांचा मध्य रेल्वेला महसूल मिळविला आहेत.

Central Railway
Vada Pav : जपानच्या राजदूतांनी पुण्यात घेतला वडापावचा आस्वाद, पत्नीही झाली खुश! पंतप्रधान मोदी म्हणाले...

मुंबई, पुणे आणि परिसरातील नागरिकांसाठी माथेरान हे सर्वात जवळचे आणि सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. नेरळ-माथेरान टॉय ट्रेन, जी शंभर वर्षांहून अधिक जुनी आहे, ही भारतातील काही पर्वतीय रेल्वेंपैकी एक आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मार्च ते मे २०२३ या तीन महिन्यांत अमन लॉज आणि माथेरान दरम्यानच्या शटल सेवेसह एकूण १ लाख ३१ हजार ४८१ प्रवाशांनी प्रवास केला आहे.

जे संबंधित कालावधीच्या तुलनेत १६. ९७ टक्के अधिक आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १ लाख १२ हजार ४०१ प्रवासी होते. मार्च २०२३ ते मे २०२३ या तीन महिन्यांच्या कालावधीत नोंदणीकृत एकूण महसूल १ कोटी १ लाख २८ हजार ४२४ वर आहे, मार्च २०२३ ते मे २०२२ या कालावधीच्या तुलनेत ३९. ९८ टक्यांनी अधिक आहे.

Central Railway
11th Admission: अकरावी ऑनलाईन प्रवेश रामभरोसे? माहिती पुस्तिकाच उपलब्ध नसल्याने विद्यार्थी संभ्रमात

ही आकडेवारी या पर्यटन स्थळी येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यात रेल्वेची महत्त्वाची भूमिका दर्शवते. मध्य रेल्वे हे ठिकाण केवळ एक प्रमुख पर्यटन स्थळच नाही तर निसर्गाच्या जवळ जाणारे ठिकाण म्हणूनही लोकप्रिय करत आहे. हे टॉय ट्रेनमधील अविस्मरणीय राईडसह निसर्ग जवळून पाहण्याचा थरार प्रदान करते आणि त्यामुळे माथेरानच्या नैसर्गिक वातावरणातील शांततेत मग्न होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.