माथेरानचे विद्यार्थी गिरवणार जपानी भाषेचे धडे; तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन

School students of Matheran
School students of Matheransakal media
Updated on

माथेरान : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या माथेरानमधील (Matheran) विद्यार्थी (students) जपानी भाषेचे धडे गिरवणार (Japanese language) आहेत. पर्यटन व्यवसाय अधिक वृद्धिंगत व्हावा, जपानी नागरिकांनी माथेरानमध्ये यावे यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नाचा हा भाग आहे. प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर आणि वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्यामंदिर या दोन्ही शाळांमध्ये (school) त्यानुसार जपानी भाषा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले. यासाठी मुंबईतील तज्ज्ञ शिक्षकांचे (Professional teacher) मार्गदर्शन लाभणार आहे.

School students of Matheran
सिडकोच्या सहा हजार घरांसाठी १९ हजार अर्ज; नोंदणीसाठी दिली मुदतवाढ

माथेरानमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये शिक्षण दिले जाते. त्यामध्ये आणखी एका भाषेची भर पडणार असून प्रथमच प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर आणि वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्यामंदिर या दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांसाठी जपानी भाषा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले. ही भाषा येथील विद्यार्थ्यांनी अवगत केल्यास जपानी पर्यटक माथेरानला भेट देतील. त्याचा फायदा पर्यटन क्षेत्राला होणार आहे. माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव यांच्या सहकार्यातून मुलुंड येथील जपानी भाषा शिक्षिका विद्या जबलपूरवाला आणि मुर्तुझा जबलपूरवाला यांच्या माध्यमातून पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना भाषा प्रशिक्षण सुरू केले आहे.

विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडते

वेगवेगळ्या भाषा शिकल्याने आपल्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होतो, असे शिक्षक संघपाल वाठोरे यांनी सांगितले. मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांनी विद्यार्थ्यांना जपानी भाषा शिकण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण ढेबे यांनी विद्यार्थ्यांना मेहनतीने भाषा शिका, भाषेतून करिअर घडवता येते, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.