Matheran Tourism : माथेरान घाटात वाहतूक कोंडी; काही पर्यटकांचा निम्म्‍यातूनच परतीचा प्रवास

पर्यटकांची गर्दी; पार्किंगसाठी जागा नसल्‍याने वाहने रस्‍त्‍यावर
matheran tourism traffic jam monsoon rain police nature environment
matheran tourism traffic jam monsoon rain police nature environmentsakal
Updated on

नेरळ : वीकेण्ड त्‍यात गटारी अमावस्‍या असल्‍याने सहलीसाठी पर्यटकांनी माथेरानला मोठ्या संख्येन हजेरी लावली. शहरातील पार्किंग हाऊसफुल्ल झाल्‍याने अनेकांनी आपली वाहने घाटरस्त्यालगत उभी केली होती. त्‍यामुळे सकाळपासूनच स्‍थानिकांसह पर्यटकांना वाहतूक कोंडीची सामना करावा लागला.

matheran tourism traffic jam monsoon rain police nature environment
Mumbai : अधिवेशन चहापान पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेता कोण ?

दरम्यान वाहतूक कोंडीत अडकलेल्या काही पर्यटकांनी निम्म्‍यातूनच परतीचा प्रवास सुरू केला तर काहींनी चालत माथेरान गाठणे पसंत केले. जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून माथेरानची ख्याती असून निसर्गाचा वरदहस्त लाभलेले छोटेसे, पर्यावरणपूरक शहर नेहमीच पर्यटकांना भुरळ घातले.

घनदाट जंगल व सह्याद्रीच्या माथ्यावर वसलेल्‍या माथेरानचे सौंदर्य पावसाळ्यात आणखीच खुलते. कर्जत तालुक्यात प्रशासनाकडून १४४ कलम लागू असल्‍याने धबधब्‍याकडे वळणारी पावले माथेरान शहराकडे वळली.

माथेरानमध्ये ५०० चारचाकी व ४०० दुचाकीची क्षमता असलेले वाहनतळ आहे, मात्र शनिवार, रविवारी पर्यटकांचा ओघ वाढल्‍याने पार्किंग फुल झाले. त्‍यामुळे अनेकांनी आपली वाहने घाटरस्‍त्‍याच्या दुतर्फा उभी केली. परिणामी दस्तुरीपासून कड्यावरचा गणपतीकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत म्हणजे ३ किमीपर्यंत वाहनांचा रांगा लागल्‍या होत्‍या.

matheran tourism traffic jam monsoon rain police nature environment
Mumbai Crime : बनावट डॉक्टरांचे रॅकेट उध्वस्त...दोघे अटकेत

पर्यटकांना गैरसोय होउ नये म्‍हणून नगपरिषदेचे तीन कर्मचारी पोलिसांसह वाहतूक व्यवस्था सांभाळत आहेत. मात्र दस्तुरी येथील पार्किंग फुल असल्याने पर्यटकांनी रस्‍त्‍यावर वाहने उभी केली आहेत. पार्किंगसाठी एमपी ९३ या प्लॉटबद्दल माहिती घेण्यात येत आहे. तसेच गव्हर्नर हिलबाबत माहिती घेणार आहोत.

- वैभव गारवे, मुख्याधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.