मुंबईतील शाळा दिवाळीनंतर सुरू होणार? महापौरांनी दिलं उत्तर

schools
schoolsesakal
Updated on

मुंबई : राज्य टास्क फोर्सने टप्प्याटप्प्याने शाळा पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, बालरोग टास्क फोर्सची बैठक नुकतीच घेण्यात आली. त्यामध्ये स्थानिक पालिकेने त्यांच्या परिसरातील वर्ग (Mumbai School Reopening) पुन्हा सुरू करायचे की नाही याबाबत अंतिम निर्णय घ्यावा, असा निर्णय झाल्याची माहिती आहे. त्याबाबतच आज महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

schools
'ते' गृहमंत्री ED ला वेडे समजले, राज ठाकरेंचा अनिल देशमुखांना टोला

गेल्या वर्षी राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मुंबईमध्ये तशी अनुकूल परिस्थिती नव्हती. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय हा दिवाळीनंतर कोरोनाची काय परिस्थिती आहे, त्यावर अवलंबून असेल, असं किशोरी पेडणेकर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या. आजही लहान मुलांचं लसीकरण पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय खूप मोठी रिस्क असेल. तसेच ८० ते ९० टक्के पालकवर्ग ही रिस्क घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे दिवाळीनंतर कोरोनाची काय स्थिती आहे त्यावरून मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्याबाबत विचार केला जाईल, असेही त्या म्हणाल्या.

बालरोग टास्क फोर्सच्या शिफारशींनुसार, शाळेत वैद्यकीय युनिट असणे आवश्यक आहे. महापालिकेने शाळा पुन्हा सुरू करायच्या की ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवायचे हा त्यांचा निर्णय आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये अद्यापही कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या आणि पॉझिटिव्ही दर यावरून शाळा सुरू करायच्या की नाहीत याबाबत महापालिका निर्णय घेऊ शकतात, असे टास्क फोर्सच्या एका अधिकाऱ्याने 'मिड-डे'सोबत बोलताना सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.