विक्रमगड : शेलपाडा येथील रहिवासी असलेला शुभम भरत पालवी (shubham bharat palavi) हा वैद्यकीय शिक्षणासाठी (Medical education) युक्रेनमध्ये (Ukraine) गेला आहे. तो युक्रेन मध्ये प्रथम वर्ष एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. देशभरातील सुमारे 20 हजार विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातील एकूण 12 विध्यार्थी पालघर जिल्हातील असल्याची माहिती जिल्हाधिकारी पालघर (Palghar) यांच्याकडून देण्यात आली आहे. या मधील दोन विध्यार्थी हे विक्रमगड तालुक्यातील आहेत.
युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्धाला सुरुवात झाली असल्याने अचानक ओढवलेल्या संकटामुळे हे विद्यार्थी आपल्या मायदेशी परतण्यासाठी धडपड करीत आहे. या बाबत शुभमने कुटुंबियांशी संपर्क साधला असता भरत पालवी यांनी सांगितले की, ह्या विद्यार्थ्यांना शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत केली गेली नसून शनिवारी माझा मुलगा शुभम व अन्य दोन हजार विद्यार्थी यांनी 3 हजार बसचे भाडे भरून रोमानीय बॉर्डर ला 12 तासाचा प्रवास करून येण्यासाठी निघाले आहे. त्यानंतर ते मायदेशी परततील विद्यार्थी सुरक्षित असले तरी शासनाकडून सहकार्य मिळालेले नाही. असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.