Measles in Mumbai : मुंबईत गोवरचा कहर; मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईतल्या रुग्णांच्या संख्येत सतरा पटीने वाढ झाली आहे.
Eknath Shinde news
Eknath Shinde newsesakal
Updated on

मुंबईत गोवर संसर्गाची तीव्रता लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक आज बोलावली आहे. यंदा सप्टेंबरपासून गोवरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईतल्या गोवरच्या रुग्णांच्या संख्येतली वाढ ही मागच्या दोन वर्षांच्या तुलनेत जास्त आहे.

या बैठकीला सार्वजनिक आरोग्य खात्याचे सचिव यांच्यासह आरोग्य विभागातील अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत. राज्य मंत्रीमंडळाची बैठक दुपारी १२ वाजता आहे. ती झाल्यानंतर ही बैठक होईल. यामध्ये गोवर आजारावरच्या प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना पुढील सूचना देतील.

हेही वाचा - Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या सहा बालके ऑक्सिजनवर आहेत. सोमवारी गोवरचे १२ रुग्ण आढळून आलेय. सध्या मुंबईत या रोगाचे १६४ रुग्ण आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईतल्या रुग्णांच्या संख्येत १७ पटींनी वाढ झाली आहे. मुंबईतल्या गोवर रुग्णांची संख्या गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.