3 मे नंतर लॉक डाऊन उठला तरीही पाळावेच लागतील 'हे' नियम, कारण कोरोनाची टांगती तलावर डोक्यावर असेल
मुंबई: कोरोनामुळे देशात परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. पहिल्यांदा २१ दिवसांचा असणारा लॉकडाऊन आता परत २० दिवसांनी वाढवण्यात आला आहे. यानंतरही राज्याची आणि देशाची स्थिती बघून लॉकडाऊन हटवण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं सरकारकडून सांगण्यात येतंय.
मात्र जर लॉकडाऊन हटवला तरीही कोरोनाचा धोका संपूर्णपणे टळला असं नाहीये. लॉकडाऊन हटवल्यानंतरही आपल्याला काही गोष्टींचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक असणार आहे. या गोष्टींचं पालन केलं नाही तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत जाण्याची शक्यता आहे. ३ तारखेला लॉक डाऊन हटवण्याबद्दल सरकारकडून अजूनही कोटाचे निर्णय झालेला नाही. जर लॉकडाऊन हाताला तरीही काही गोष्टींचा अवलंब करणं गरजेचं असणार आहे.
सोशल डिस्टंसिंग:
कोरोनापासून बचाव करण्याचा रामबाण उपाय म्हणजे सोशल डिस्टंसिंग. म्हणजेच कुठेही वावरत असताना इतर लोकांपासून कमीतकमी १ मीटरचं यानंतर ठेवणे किंवा तुमच्यात लक्षणं आढळली तर कुठे बाहेर न जाता घरीच राहणे. काही देशांनी सोशल डिस्टंसिंगच्या माध्यमातून काही प्रमाणात कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण ठेवलं आहे. ज्या ठिकाणी लॉकडाऊन उठवण्यात येईल अशा ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचं काटेकोरपणे पालन करणं महत्वाचं आहे. तसंच घराबाहेर पडताना मास्क घालणं आवश्यक आहे.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग:
लॉकडाउननंतर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर द्यावा लागणार आहे. कोरोनाची बाधा आणि संसर्ग टाळण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिकाधिक जोर द्यावा लागणार आहे. ज्या व्यक्ती कोरोनाबाधितांच्या किंवा संशयितांच्या संपर्कात आल्या असतील त्यांना क्वारंटाइन करावं लागणार आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव अधिक होणार नाही.
सार्वजनिक स्थळी काळजी घ्यावी:
लॉकडाऊन संपल्यावरही लोकांना सार्वजनिक स्थळी जाताना लोकांना काळजी घेण्याची गरज असणार आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सार्वजनिक स्थळी जाताना सोशल डिस्टंसिंगचं भान आपल्या ठेवणं आवश्यक असणार आहे.
विमान प्रवासात दक्षता घेणं:
लॉकडाऊन संपल्यानंतरही विमान वाहतूक सुरू करण्याआधी सावधानता बाळगून 'रिस्क मॅनेजमेंट'ची आवश्यकता भासणार आहे. लॉकडाऊन हटवल्यानंतर विमान प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी करणं गरजेचं असणार आहे.
ऑफिसमध्ये घायची काळजी
३ मे नंतर सरसकट १०० टक्के ऑफिसेस सुरु होण्याची शक्यता कमीच आहे. अशात काही प्रमाणात ऑफिसेस सुरु होऊ शकतात. या दरम्यान तुम्ही जर ऑफिसला जात असाल तर ऑफिसमध्ये सर्वांची गळाभेट घेणं टाळा. एकमेकांना दुरूनच अभिवादन करा. चहा किंवा जेवायला एकत्र जाऊ नका. एकमेकांमध्ये अंतर ठेऊन बस आणि तोंडावर मास्क देखील लावा.
घरात घायची काळजी :
लॉकडाऊन नंतर आपल्याला सर्वात जास्त काळजी घरात घ्यावी लागणार आहे. कारण आपण बाहेर जाऊन आलो किंवा ऑफिसमध्ये जाऊन आलोत तर आपल्यासोबत अनेक विषाणू घरापर्यंत येऊ शकतात. अशात सर्वात आधी अंघोळ करणं योग्य राहील. शक्य असल्यास स्वतःचे कपडे स्वतःच धुवून टाका. तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल असं जेवण करा आणि आपली व्यवस्थित झोप देखील घ्या.
measures needs to be taken even if lockdown is removed after third may
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.