देवदर्शनासाठी गेलेले मुंबईचे मेडिकलचे तीन विद्यार्थी बुडाले गंगा नदीत

Mumbai medical students
Mumbai medical studentssakal media
Updated on

दहिसर : मेडिकलचे शिक्षण (medical student) पूर्ण करून देव दर्शनासाठी हरिद्वार (Haridwar) येथील गंगा नदीत (ganga river) स्नान करण्यासाठी उतरलेले मुंबईतील (Mumbai) तीन विद्यार्थी वाहून गेल्याची दुर्घटना उघडकीस आली आहे. गंगेच्या खोल पाण्यात उतरलेले हे तीन जण नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती आहे. अद्याप बेपत्ता झालेल्या तिघाचाही शोध लागलेला नाही. (medical student-haridwar-ganga river- drowning-Mumbai-nss91)

वैद्यकीय शिक्षण घेणारे मुंबईतील मधुश्री खुरसंगे,अपूर्वा केळकर, मेलरॉय डेंट्स, निशा गोस्वामी व करण मिश्रा हे पाच जण उत्तराखंडला गेले होते. मुंबईच्या विविध भागात राहणारे हा पाच मित्र-मैत्रिणींचा ग्रुप 30 जुलै रोजी उत्तराखंडमधील हरिद्वार येथे गेला होता.यातील सर्व विद्यार्थी काही दिवसांनी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार होते. त्यामुळे हे सर्वजण देवदर्शनासाठी गेले होते. कांदिवली, बोरिवली आणि मीरा रोड परिसरात राहणाऱ्या या पाच जणांमध्ये 3 मुली आणि 2 मुलाचा समावेश आहे.

Mumbai medical students
विविध मागण्यांसाठी ऑगस्ट क्रांतिदिनी रंगकर्मींचे आंदोलन

बुधवारी दुपारी दोन वाजता हे सर्व जण गंगा नदीत स्नान करण्यासाठी उतरले होते. त्यांनी देवदर्शन करून गंगेत पैशाचे नाणे टाकले. याठिकाणी देवदर्शन करून नाणे नदीत टाकून आपली मनोकामना व्यक्त करण्याची प्रथा आहे. त्यावेळी अपूर्वा केळकर पुन्हा पाण्यात उतरली असता तिचा पाय घसरून ती पाण्यात वाहू लागली. हे पाहताच मधुश्री खुरसंगे व मेलरॉय डेंट्स हे तिला वाचवण्यासाठी पाण्यात उतरताच ते दोघेही प्रवाहात वाहून गेले. तर सोबत असलेले करण मिश्रा आणि निशा गोस्वामी पाण्यातून बाहेर आले.यावेळी गंगा नदीच्या पाण्याला प्रचंड प्रवाह असल्यामुळे इतर तिघेजण पाण्यासोबत वाहून गेले . गंगा नदीत उतरल्याच्या वेळी एकीने त्यांचा पहिला व्हिडीओ काढला होता. तिघे वाहून गेल्यानंतर

करण मिश्राने याची माहिती ते सर्व जण जिथे थांबले होते, त्या हॉटेल चालकाला दिली. त्यानंतर स्थानिक पोलिसांना याविषयी सांगण्यात आले.तातडीने शोध कार्य सुरु करण्यात आले, मात्र सहा तास शोध घेऊनही या तिन्ही मुली सापडल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.हे सर्वजण सुखरूप घरी यावेत यासाठी प्रार्थना केली जात आहे.यातील मधुश्री ही शिवसेना नगरसेविका रिद्धी खुरसंगे यांची पुतणी आहे. त्यांच्या तपासासाठी माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे हे उत्तराखंडला रवाना झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.