Meera road crime : आधी हत्या, इलेक्ट्रीक करवतीने तुकडे, नंतर कुकरमध्ये शिजवलं; पोलिसांना...

Meera road crime
Meera road crime
Updated on

- प्रकाश लिमये

भाईंदर : मिरा रोड येथे महिलेची हत्या करुन तिचे तुकडे करण्यात आल्याच्या घटनेत पोलीस तपासात खळबळजनक बाब उघड झाली आहे. आरोपीने हत्या केल्यानंतर महिलेच्या शरीराचे इलेक्ट्रीक करवतीने तुकडे करुन ते कुकरमध्ये शिजवले व नंतर त्यातील काही तुकडे फेकून देऊन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. शरीराच्या तुकड्यांची दुर्गंधी येऊ नये तसेच त्याची विल्हेवाट लावणे सोपे व्हावे यासाठी आरोपीने हे कृत्य का केले असावे, याबाबतपोलीसांनी माहिती दिली.

Meera road crime
Drone : छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार ड्रोनची निर्मिती; ड्रोन क्लस्टरसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव

मिरा रोडच्या नयानगर परिसरातील गीता नगर भागातील आकाश दीप इमारतीमधील घरातून बुधवारी रात्री महिलेच्या शरीराचे तुकडे करण्यात आले असल्याचे पोलीसांना आढळून आले होते. सरस्वती वैद्य (वय ३२) असे त्या महिलेचे नाव होते.

याप्रकरणी पोलीसांनी मनोज साने (वय ५६) याला रात्रीच ताब्यात घेतले. दोघेही लिव्ह इन मध्ये रहात होते. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मनोज साने याने पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार सरस्वती हिने विष घेऊन आत्महत्या केली व पोलीसांनी त्याच्यावर संशय घेऊ नये म्हणून त्याने तीच्या शरीराचे तुकडे केले. परंतू पोलीसांनी मात्र त्याला दुजोरा दिलेला नाही.

पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज साने हा बोरिवली येथील शिधावाटप दुकानात काम करत असताना दहा वर्षांपूर्वी त्याची सरस्वतीसोबत ओळख झाली. त्यानंतर ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहुल लागले. पाच वर्षांपूर्वी ते मिरा रोडला भाड्याच्या घरात रहायला आले होते. त्यांच्यात नेहमी भांडणे होत होती. मनोज नेहमी घरी उशिरा येत असे व त्याचे अन्यत्र अनैतिक संबंध असल्याचा सरस्वतीला संशय होता.

Meera road crime
महाराष्ट्राच्या नारीशक्तीचा देशात डंका! सर्वाधिक सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजिका आपल्या राज्यात;

त्यावरुन दोघांमध्ये कडाक्याची भांडणे होत होती असे मनोजचे म्हणणे आहे. चार जूनला देखील दोघांमध्ये भांडण झाल्यामुळे मनोजने सरस्वतीची हत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे. मात्र हत्येमागचे खरे कारण अद्याप उघड झालेले नाही. तीने विष घेऊन आत्महत्या केली होती का हे उत्तरीय तपासणीच्या अहवालावरुनच स्पष्ट होईल असे बजबळे यांनी सांगितले.

हत्या केल्यानंतर मनोजने सरस्वती हीच्या मृतदेहाचे इलेक्ट्रीक करवतीच्या मदतीने छोटे छोटे तुकडे केले. त्याची शेजार्‍यांना दूर्गंधी येऊ नये म्हणून मनोज ते कुकरमध्ये घालून शिजवत होता. यातील काही तुकडे त्याने फेकून देखील दिले. मात्र घरातील बादलीत व टबमध्ये असंख्य तुकडे पोलीसांना आढळून आले. हे सर्व तुकडे पोलीसांनी उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत.

शेजारी रहाणार्‍यांना मनोज याच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर त्यांनी मनोजला तसे सांगितले देखील. मात्र त्याने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे शेजार्‍यांना संशय येऊन त्यांनी त्याची माहिती पोलीसांना दिली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. सरस्वती हीचे कोणीही नातेवाईक नाहीत मात्र मनोज याचे नातेवाईक असल्याचे समजले असून त्यांचा शोध सुरु आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली.

दरम्यान राज्य महिला आयोगाच्या सदस्यांनी याप्रकरणी शुक्रवारी नयानगर पोलीस ठाण्याला भेट दिली. हत्येमागचे कारण पोलीसांनी शोधून काढावे व आरोपीला कडक शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करावेत अशी मागनी त्यांनी केली. असे प्रकार टाळण्यासाठी पोलीसांनी हेल्पलाईन सुरु करावी जेणेकरुन लोकांना व विशेष करुन महिलांना पोलीसांकडून तातडीने मदत मिळू शकेल अशी मागणीही आयोगाच्या सदस्यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.