महाविकासआघाडीचा मास्टरप्लॅन; पवारांकडे नेतृत्व 

meeting of NCP Shivsena and Congress at Sofitel hotel
meeting of NCP Shivsena and Congress at Sofitel hotel
Updated on

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने उद्याच बहुमत चाचणी होणार असा निर्णय दिल्यानंतर महाविकासआघाडीत पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबईच्या सोफीटेल हॉटेलमध्ये शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेसचे काही नेते यांची बैठक सरू आहे, त्यामुळे उद्या नक्की काय होणार, कोण बहुमत सिद्ध करणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 

यापूर्वी बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 नोव्हेंबर तारीख देण्यात आली होती. मात्र, फडणवीस व अजित पवारांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाविकासआघाडीने शनिवारी रात्री याचिका दाखल केली होती. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिला की, उद्याच (ता. 27) बहुमत चाचणी होईल. फडणवीस सराकरला उद्या संध्याकाळी पाच पर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे फडणवीस बहुमत सिद्ध करू शकतात का, की महाविकासआघाडी बहुमताचा दावा करणार याबाबत तर्क-वितर्क मांडले जात आहेत. 

काही वेळापूर्वी काँग्रेसच्या गटनेतेपदी आज (मंगळवार) बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर काँग्रेसने सर्व आमदारांच्या सह्या घेऊन राज्यपालांना पत्र दिले आहे. अजित पवार भाजपसोबत गेल्याने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. आता अजित पवारांचे मन वळविण्यासाठी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांच्या भेटी घेण्यात येत आहेत. अशोक चव्हाण यांनीही त्यांनी परत यावे असे म्हटले आहे.

आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर लगेचच राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसचे प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत महाविकासआघाडीचे नेता निवडला जाण्याची शक्यता आहे. तसेच उद्या बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आज (ता. 26) संध्याकाळी पाच वाजता महाविकासआघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होईल. या पत्रकार परिषदेत महाविकासआघाडीचे नेतृत्व कोणता नेता करणार हे जाहीर केले जाईल. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. संध्याकाळी बीकेसीमध्ये ही संयुक्त पत्रकार परिषद घेतली जाईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.