Cabinet Meeting: जुन्या निवृत्ती वेतनाबाबत शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; कॅबिनेट बैठकीत निर्णय

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयात पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री उपस्थित होते.
Cabinet Meeting: जुन्या निवृत्ती वेतनाबाबत शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; कॅबिनेट बैठकीत निर्णय
Updated on

मुंबई- राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयात पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री उपस्थित होते. नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हें २००५ नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्यात येणार आहे. त्यामुळे साडेचार ते पाच हजार शासकीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठतीत पुढील निर्णय घेण्यात आले आहेत.

* नोव्हें २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हें २००५ नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय दिला जाईल ( वित्त विभाग)

* अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित. कारसाठी 250 रुपये ( नगरविकास विभाग )

* दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान. ( दुग्धव्यवसाय विकास)

Cabinet Meeting: जुन्या निवृत्ती वेतनाबाबत शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; कॅबिनेट बैठकीत निर्णय
PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारीला होणार शिवडी- न्हावा शेवा सी लिंक प्रकल्प लोकार्पण

* विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धतेची अट शिथिल करणार ( जलसंपदा विभाग)

* मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता. ( वित्त विभाग)

* पॉवरलूमला प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान . ४०० उद्योगांना फायदा ( वस्त्रोद्योग)

Cabinet Meeting: जुन्या निवृत्ती वेतनाबाबत शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; कॅबिनेट बैठकीत निर्णय
धार्मिक तीर्थक्षेत्राचा विकासाबाबत आपले सरकार कमी पडणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

* रेशीम उद्योगाच्या विकासासाठी " सिल्क समग्र २" योजना राबविणार. रेशीम शेतकऱ्यांना मोठा लाभ ( वस्त्रोद्योग विभाग)

* द्राक्ष उत्पादकांच्या हिताची वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना सात वर्षांसाठी राबविणार( उद्योग विभाग)

* नांदेड - बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देणार. ७५० कोटीस मान्यता( परिवहन विभाग)

* सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास प्रस्तावासाठी कालावधी वाढवला ( सहकार विभाग) (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.