महाड तालुक्यामध्ये कोरोनाग्रस्त महिलेचा काल रात्री (दिनांक २८ रोजी ) मृत्यू झाल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण असतानाच याबाबत कुठलेही गांभीर्य नसलेल्या महाड पंचायत समितीच्या पदाधिकारी आणि अधिका-यांनी पंचायत समितीच्या कार्यालयात चक्क मटनभाताची जेवणावळ झोडली. आज दिवसभरात या जेवणाची सर्वत्र चर्चा होती.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद गोडांबे यांचा वाढदिवस आणि पंचायत समितीची मासिक सभा असा योग जुळून आल्याने हा बेत आखण्यात आलेला होता. लाँकडाऊनमध्ये ग्रामसभा, मासिक सभा घेण्याबाबत निर्बंध आहेत. तरीही महाड पंचायत समितीची मासिक सभा पंचायत समितीच्या बाळासाहेब ठाकरे सभागृहात तसेच जुजबी पार पडली. याच दिवशी आज गटविकास अधिकारी प्रमोद गोडांबे यांचा वाढदिवस असल्याने भात, मटण, रस्सा जेवणही ठेवलेले होते.
सभापतींच्या दालनामध्ये मेजवानीच्या पंगती झोडल्या गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे. कोरोना पार्श्वभूमीवर महसूल, पोलिस, आरोग्य यंत्रणा चोवीस तास कोरोनाशी सक्रियपणे लढा देत आहे. गरीबांना अन्नाशिवाय दिवस काढावे लागत आहेत, तर दुसरीकडे पंचायत समितीच्या सभापती तसेच अन्य पदाधिकारी आणि अधिकारी यांनी मात्र अशा प्रकारे मटणाच्या जेवणाला हजेरी लावल्याने या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील बीरवाडी येथे कोरोनामुळे महिलेच्या मृत्यू झाला तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचे उपाय सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे; परंतु पंचायत समितीत हे सर्व नियम आणि आदेश बासनात गुंडाळून कार्यालयातच भरदिवसा जेवणाचा आस्वाद घेतला गेला. याबाबत गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे दोन्ही फोन नंबर बंद होते; परंतु शहरात मात्र या जेवणाची जोरदार चर्चा रंगलेली होती.
members of panchayat samiti done mutton party in mahad
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.