जबाबदारीतून पळणार नाही!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जागवल्या ‘मार्मिक’च्या आठवणी
Uddhav thackeray
Uddhav thackeraySakal
Updated on

मुंबई : जबाबदारीतून पळणाऱ्यांपैकी मी नाही. अन्याय करणाऱ्याच्या छाताडावर पाय देणारा मराठी माणूस आहे, अशा शब्दात आज मुख्यमंत्री (CM) तथा शिवसेनेचे (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोधकांना इशारा दिला. ‘मार्मिक’ (Touching’) साप्ताहिकाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी ‘मार्मिक ’चा जन्म, त्यातून उभी राहिलेली शिवसेना (Shivsena),आणीबाणीच्या काळातील आठवणी जाग्या केल्या.

Uddhav thackeray
झेंड्यांची निर्मिती १५ लाखांहून ५० हजारांवर

'आज मार्मिक ६१ वर्षांचे झाले, माझेही वय तेवढेच आहे. शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे शतायुषी झाले आहेत. तसेच मार्मिकही शतायुशी होईल, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.'

बाळासाहेबांनी कृती केली

नोकरी सोडा, व्यवसाय करा हे सर्वच सांगतात; पण शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी कृतीतून ते दाखवून दिले होते. त्यांनी नोकरी सोडून ‘मार्मिक’ साप्ताहिक सुरू केले. माजी मंत्री दिवाकर रावते तेव्हा ‘मार्मिक’ हातगाडीवरून घेऊन जायचे. ही लढायची वृत्ती ‘मार्मिक’ने दिली, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.