एसटी कर्मचाऱ्यांच्य संपाला हिंसक वळण लागल्यानंतर राज्यात मोठ्या नाटकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांच्या बंगल्यावर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण प्रकरण म्हणजे कटकारस्थान असल्याची टीका होत आहे. कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सर्वांची माथी भडकावल्याचा आरोप होत आहे.
यानंतर सदावर्तेंना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. मात्र त्याआधी सोशल मीडियावर काही मेसेज व्हायरल होत आहेत. हे मेसेज सदावर्तेंना पाठिंबा देण्याचे आवाहन करत असून त्यामध्ये कोर्टासमोर हजर राहण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे.
शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यात सदावर्तेंचा हात असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलीस देखील याच बाजूने तपास करत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी सदावर्तेंचा पाठिंबा असल्याची वक्तव्य केली आहेत. सदावर्तेंना अटक झाल्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्याआधीच असे मेसेज व्हायरल होत आहेत.
पोलिसांना सहकार्य करणार - सदावर्ते
चौकशीमध्ये पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्यांना गुणरत्न अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Gunaratna Sadavarte Detained by mumbai Police)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.