मेट्रो वनची प्रवासी संख्या दोन लाखांवर

कोरोनापूर्व काळात या मार्गावरून रोज तब्बल चार लाख ५० हजार प्रवाशांचा प्रवास होत होता
Metro
Metrosakal
Updated on

मुंबई : घाटकोपर- अंधेरी-वर्सोवा या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो वनची (metro one) रोजची प्रवासी संख्या आता दोन लाख झाली आहे. कोरोनापूर्व काळात या मार्गावरून रोज तब्बल चार लाख ५० हजार प्रवाशांचा प्रवास होत होता. त्यामुळे आता संख्या वाढली असली, तरी ही कोरोनापूर्व प्रवासी संख्येच्या ५० टक्के कमी आहे.

मार्च२०२०मध्ये भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर टाळेबंदी जाहीर करण्यात आली. त्यामुळे रेल्वे वाहतुकीपाठोपाठ मुंबईतील मेट्रो वनची सेवा बंद ठेवण्यात आली होती. कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर ऑक्टोबर २०२० मध्ये ही सेवा पूर्ववत करण्यात आली. या वेळी मेट्रोमध्ये दररोज साधारण ८० हजार प्रवासी प्रवास करत होते. फेब्रुवारी २०२१ मध्ये दिवसभरात सुमारे ९० हजार प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला. त्यानंतर काही दिवसांत ही संख्या एक लाखांवर पोहोचली होती. प्रवाशांची संख्या आणखी वाढेल अशी अपेक्षा असताना दुसरी लाट येऊन धडकली. त्यामुळे प्रवासावर निर्बंध येऊन दुसऱ्या लाटेत पुन्हा प्रवासी संख्या घटली. एप्रिल-मे महिन्यात ही संख्या ५० हजारांवर आली.

Metro
मुंबई विद्यापीठाच्या पेट परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; वाचा सविस्तर माहिती

त्यानंतर प्रवासाच्या नियमांमध्ये शिथिलता आणि निर्बंध हटवल्यामुळे जुलै २०२१ नंतर त्यात सुधारणा होण्यास सुरुवात झाली. ऑगस्ट २०२१ मध्ये पुन्हा एक लाख प्रवासी संख्या झाली. आता युनिव्हर्सल पासधारक प्रवासी वाढत असल्याने लोकलमधील प्रवाशांची संख्या वाढत आहे. ऑफलाईन शाळा-महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे डिसेंबरअखेरपर्यंत प्रवासी संख्या दोन लाख २५ हजारांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.

कोरोनानंतर सर्वाधिक प्रवासी संख्येची नोंद ७ डिसेंबर रोजी झाली आहे. या दिवशी दोन लाख दोन हजार ५३६ प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला. दरम्यान, सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी दर चार मिनिटाला मेट्रोची एक फेरी होते. इतर वेळी म्हणजेच कमी गर्दी असताना सहा ते १० मिनिटांनी मेट्रोची एक फेरी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()