Mhada News: कोकण मंडळाच्या घरासाठी आठ दिवसांत ४७०१ अर्ज

Mumbai Latest Update: प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेसाठी ३,४०० अर्ज आले आहेत.
Mhada 4701 applications for Konkan Mandal housing in eight days
Mhada 4701 applications for Konkan Mandal housing in eight days sakal
Updated on

Mumbai News: म्हाडाच्या मुंबई मंडळाने कोकण मंडळातील १२ हजारहून अधिक घरांसाठी काढलेल्या सोडतीत ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठ दिवसांत ४,७०१ जणांनी सोडतीत अर्ज केला आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेसाठी ३,४०० अर्ज आले आहेत.

म्हाडाच्या कोकण मंडळाने ठाणे शहर, कल्याण, टिटवाळा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील १२ हजार ६२६ घरांसाठी इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. यामध्ये लॉटरीच्या माध्यमातून विक्री केल्या जाणाऱ्या १,४३९ घरांसाठी तसेच ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या माध्यमातून ११ हजार १८७ घरे विकली जाणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.