मुंबई : खेळाची मैदाने, उद्याने यांच्यासाठी आरक्षित असलेले सुमारे 80 सुविधा भूखंड (reserved land) म्हाडा (mhada) देखभालीसाठी महापालिकेच्या (bmc) ताब्यात देणार आहे. यासाठीच्या जोरदार हालचाली म्हाडा मुख्यालयात सुरु असून हे भूखंड लवकरच पालिकेला देण्याची तयारी म्हाडाने केली आहे. यामुळे आरक्षित भूखंडावर विविध विकास कामांसाठी (developments) निधी खर्च करण्यावरून नगरसेवक आणि आमदारांमध्ये होणाऱ्या वादांवर पडदा पडणार आहे. ( Mhada about to handovers reserve land to bmc -nss91)
राज्य सरकारने म्हाडाला स्वतंत्र नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिल्यानंतर मुंबई शहर व उपनगरातील म्हाडा वसाहतींमध्ये महापालिकेतर्फे मलनिःसारण, वाहिन्या, जयवाहिन्या जोडणी, रस्त्यांची दुरुस्ती इत्यादीसारख्या मूलभूत सुविधा देण्यास नकार दिला होता. नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता म्हाडा आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मुंबई शहर व उपनगरातील म्हाडा वसाहतींमध्ये मलनिःसारण वाहिन्या, जलवाहिन्या, रस्ते दुरुस्ती आदी मूलभूत सुविधा महापालिकेमार्फतच पुरविल्या जातील, असा निर्णय घेतला.
तसेच महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार म्हाडा वसाहतीमधील आरक्षित भूखंड असलेले खेळाची मैदाने, उद्याने आदी भूखंड महापालिकेकडे सोपविणे आवश्यक आहे. त्यानुसार म्हाडाने आपल्या हद्दीतील भूखंड महापालिकेच्या ताब्यात तात्पुरत्या स्वरूपात देण्याचे निर्णय घेतला आहे. त्यानुसार म्हाडाने शहर आणि उपनगरातील सुमारे 80 भूखंडांची यादी तयार केली आहे. तसेच इतर भूखंडांचीही माहिती जमा करण्याचे काम सुरु असून यासाठी सतत बैठकांचा जोर वाढला आहे. तात्पुरत्या स्वरूपात हे भूखंड म्हाडा महापालिकेच्या ताब्यात देणार आहे. म्हाडाकडे असलेल्या या भूखंडांवर नगरसेवक आणि आमदार निधीतून कामे करण्यासाठी चढाओढ लागत होती. मात्र आता हे भूखंड महापालिकेच्या ताब्यात जाताच लोकप्रतिनिधींमध्ये होणारे वाद शमणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.