MHADA Fake Website: फुकट घर अन् बनवली म्हाडाची फेक वेबसाईट; ग्राफिक डिझायनर, वेब डेव्हलपर कसे फसले?

MHADA Fake Website Case: म्हाडाच्या बनावट संकेतस्थळाद्वारे जाळ्यात अडकलेल्या नागरिकांकडून पैसे स्वीकारण्यासाठी पेमेंट गेटवे उपलब्ध करून देणाऱ्या एका कंपनीची सेवा या आरोपींनी घेतली होती.
MHADA Fake Website Case
MHADA Fake Website CaseEsakal
Updated on

मुंबई, ता. 22 : घर फुकटात मिळणार, या आशेवर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या दोन तरुणांनी मुख्य आरोपींना म्हाडाचे बनावट संकेतस्थळ तयार करून दिले, अशी माहिती सायबर पोलिसांच्या तपासातून पुढे येत आहे.

म्हाडा बनावट संकेतस्थळ प्रकरणात सायबर पोलिसांनी बुधवारी (ता. 21) ओमकार शिंदे (वय 26) आणि सत्यम तिवारी (वय 25) या दोघांना अटक केली.

हे दोघे मुंबईतील एका खासगी कंपनीत अनुक्रमे ग्राफिक डिझायनर आणि अँड्रॉइड डेव्हलपर या पदावर कार्यरत होते. यातील ओमकार आणि मुख्य आरोपी अमोल पटेल (सावंत) हे मित्र आहेत. अमोल म्हाडात दलाली करतो; याची जाणीव ओमकारला होती. (MHADA Fake Website Case)

पोलिसांच्या तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीच्या सोडतीत विकल्या न गेलेल्या, सध्या बंद असलेल्या म्हाडा सदनिकांच्या ऑफलाइन विक्रीची जबाबदारी म्हाडा अधिकाऱ्यांनी आपल्यावर दिल्याचे अमोलने ओमकारला सांगितले. त्यासाठी म्हाडा सारखेच हुबेहूब संकेतस्थळ तयार करणे शक्य आहे का, तसे झाल्यास बंद घरांसाठी ग्राहक शोधणे सोयीस्कर होईल, असा दावा अमोलने केला.

या कामात मदत केल्यास यातलेच एक बंद घर मिळवून देईन, असे प्रलोभन अमोलने ओमकारला दाखवले. ओमकारने अमोलवर विश्वास ठेवत कंपनीतील सहकारी सत्यम याच्यासोबत म्हाडाप्रमाणे हुबेहूब संकेतस्थळ तयार केल्याची माहिती पुढे आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

ओमकार, सत्यम यांनी अमोलच्या सांगण्यावर अन्य अटक आरोपी कल्पेश सेवक याचे तपशील वापरून होस्टिंगर नावाच्या परदेशी कंपनीद्वारे हे बनावट संकेतस्थळ सुरू (होस्ट) केले, मात्र या संकेतस्थळाचा वापर अमोल नागरिकांच्या फसवणुकीसाठी करणार आहे, याची कल्पना ओमकार, सत्यम यांना नव्हती.

म्हाडाने या बनावट संकेतस्थळाबाबत पत्रकार परिषद घेतली. तेव्हा या दोघांना आपल्या हातून गुन्हा घडल्याची जाणीव झाली, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

MHADA Fake Website Case
Iqbal Chahal: बदलापूर प्रकरणानंतर मोठी घडामोड! इक्बाल चहल यांची गृहविभागाच्या अप्पर मुख्य सचिवपदी नियुक्ती

‘पेमेंट गेटवे’ची मर्यादा वाढविण्याची धडपड

म्हाडाच्या बनावट संकेतस्थळाद्वारे जाळ्यात अडकलेल्या नागरिकांकडून पैसे स्वीकारण्यासाठी पेमेंट गेटवे उपलब्ध करून देणाऱ्या एका कंपनीची सेवा या आरोपींनी घेतली होती. सुरुवातीला या सेवेद्वारे फक्त ५० हजार रुपयेच स्वीकारण्यावर कंपनीचे बंधन होते. व्यवहार वाढल्यावर ही मर्यादा सात लाख रुपयांपर्यंत शिथिल होणार होती. मुख्य आरोपी अमोल, कल्पेश यांची त्यासाठी धडपड सुरू होती.

MHADA Fake Website Case
Lighting On Trees: झाडांवरील विद्युत रोषणाईप्रकरणी भूमिका काय? हायकोर्टाने मुंबई, ठाणे पालिकेसह सरकारला केला सवाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.