Mhada Draw : मुंबई म्हाडाच्या सोडतीत २ हजारांहून अधिक अर्जदार अपात्र; १,२०,१४४ अर्जदार पात्र

म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील ४०८२ घरांच्या विक्रीकरिता सोडत पूर्व प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेत प्राप्त १,४५,८४९ अर्जांपैकी १,२०,१४४ अर्ज संगणकीय सोडतीत सहभागी होणार आहेत.
Mhada Draw
Mhada DrawSakal
Updated on

मुंबई - म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील ४०८२ घरांच्या विक्रीकरिता सोडत पूर्व प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेत प्राप्त १,४५,८४९ अर्जांपैकी १,२०,१४४ अर्ज संगणकीय सोडतीत सहभागी होणार आहेत. यामार्फत अंदाजे ५१९ कोटी रुपयांच्या अनामत रकमेचा भरणा झाला आहे. तर २१७५ अर्ज या प्रक्रियेत अपात्र ठरले आहेत.

या अपात्र अर्जदारांना अनामत रकमेचा परतावा तातडीने करण्यात येईल अशी माहिती म्हाडाने दिली आहे. मात्र अद्याप मंडळाने सोडतीची तारीख जाहीर केली नाही. त्यामुळे आता पात्र अर्जदाराचे लक्ष सोडतीकडे लागले आहे.

मुंबई मंडळाच्या सदनिका विक्री सोडतीत सहभाग घेणार्‍या पात्र अर्जदारांची सूची म्हाडाच्या संकेतस्थळावर २८ जुलै रोजी दुपारी तीन वाजता प्रसिद्ध करण्यात आली आहे. ता. २२ मे रोजी दुपारी ३.०० वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली.

तेव्हापासून ता. ११ जुलै या अर्ज प्रक्रियेच्या शेवटच्या दिवसापर्यंत संगणकीय सोडत प्रणालीमध्ये १,४५,८४९ अर्ज प्राप्त झाले होते. १,२२,३१९ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला होता. अर्जांच्या छाननी प्रक्रियेअंती २१७५ विविध कारणांमुळे अपात्र ठरविण्यात आले आहे.

प्राप्त अर्जाची संख्या

विक्री करिता जाहीर करण्यात आलेल्या ४०८२ घरांपैकी प्रधान मंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत पहाडी गोरेगाव येथील १९४७ घरांसाठी २२,४७२ अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच उत्पन्न गटनिहाय अत्यल्प उत्पन्न गटातील ८४३ सदनिकांसाठी २८,८६२ अर्ज प्राप्त झाले आहेत. या उत्पन्न गटातील सर्वाधिक अर्ज कन्नमवार नगर विक्रोळी (४१५) या योजनेकरिता झाले आहेत.

अल्प उत्पन्न गटातील १०३४ सदनिकांसाठी ६०,५२२ अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज पहाडी गोरेगांव(४१६) या योजनेकरिता आहेत आहेत. मध्यम उत्पन्न गटातील १३८ सदनिकांसाठी ८३९५ अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज उन्नत नगर गोरेगांव येथील गृहनिर्माण योजनेकरिता आले आहेत.

उच्च उत्पन्न गटातील १२० सदनिकांसाठी २०६८ अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज शिंपोळी कांदीवली पश्चिम येथील गृहनिर्माण योजनेकरिता आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.