Mumbai News : १२५ गिरणी कामगारांना मिळणार हक्काच घर; २९ ऑगस्ट रोजी गृहनिर्माण मंत्र्याच्या हस्ते चावी वाटप

म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे सन २०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी जाहीर सोडतीतील १२५ यशस्वी पात्र गिरणी कामगार
mhada house 125 girni workers get homes atul save distribute keys mumbai
mhada house 125 girni workers get homes atul save distribute keys mumbaisakal
Updated on

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे सन २०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी जाहीर सोडतीतील १२५ यशस्वी पात्र गिरणी कामगार आणि वारस यांना दि. २९ ऑगस्ट, २०२३ रोजी सदनिकांच्या चाव्यांचे वाटप राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील गुलजारीलाल नंदा सभागृह येथे दुपारी ४ वाजता आयोजित या कार्यक्रमाला गिरणी कामगार घर सनियंत्रण समितीचे अध्यक्ष व आमदार सुनील राणे, आमदार कालिदास कोळंबकर,

आमदार प्रकाश आबिटकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, कामगार आयुक्त सतीश देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सन २०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी जाहीर सोडतीतील ३०३८ पैकी ८५६ यशस्वी पात्र गिरणी कामगार/ वारस यांना आतापर्यंत तीन टप्प्यांतर्गत सदनिकांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले आहे. चावी वाटपाच्या चौथ्या टप्प्यांतर्गत आयोजित या कार्यक्रमाला संबंधित गिरणी कामगार/ वारस यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.