मुंबईकरांना गुडन्युज! म्हाडाच्या 9000 घरांची दसऱ्याला सोडत

म्हाडा
म्हाडा
Updated on

दोन वर्ष रखडल्यानंतर आता दसऱ्याला मुंबईकरांना परवडणारं घर मिळणार आहे. म्हाडाच्या (MHADA) कोकण मंडळाने दसऱ्याच्या मुहूर्तावर सुमारे 9000 घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई-ठाणेकरांना शहराजवळ परवडणारे घर मिळणार आहे. मुंबई मंडळाप्रमाणेच म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडतही मागील तीन वर्षांपासून रखडली होती. पण आता लवकरच या प्रकल्पाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

कोकण मंडळाच्या घराच्या सोडतीची घोषणा याआधीही झाली होती. पण, काही तांत्रिक अडचणीमुळे घरांची सोडत बरगळली होती. पण आता दसऱ्याला सोडत होणार आहे. कोकण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दसऱ्याला होणाऱ्या या सोडतीत 300 ते 700 चौ. फुटांपर्यंतच्या घरांचा समावेश असेल. या घरांच्या किमती 12 ते 56 लाख रुपयांच्या दरम्यान असतील. असेही सांगण्यात आलं.

म्हाडा
'मंत्री झाले अन् कोकणावर संकट आलं, राणे पांढऱ्या पायाचे'

म्हाडाच्या सोडतीकडे राज्यभरातील नागरिक उत्सुकतेने वाट पाहात असतात. परंतु, गेल्या काही वर्षांपासून मंडळाकडे जमिनीअभावी घरे उपलब्ध होत नसल्याने खूप कमी घरांची सोडत काढण्यात येत आहे. या सोडतीमध्ये मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून व यापूर्वीच्या सोडतीमध्ये विजेत्यांची ताबा न घेतलेल्या घरांचा समावेश करण्यात येतो. 2019 मध्ये मंडळाने सोडत काढली होती. यानंतर गेल्यावर्षी सोडत काढण्यासाठी घरे नसल्याने सोडत निघू शकली नव्हती.

म्हाडा
...तर निर्बंध कमी होतील, राजेश टोपे यांचं सूचक विधान

कुठे- किती घरे?

- मिरारोड येथे मध्यम उत्पन्न गटासाठी 196 घरे

- वर्तक नगर, ठाणे येथील अल्प गटातील 67 घरे

- विरार-बोळींजमधील 1300 घरे आहेत. त्यातील सुमारे एक हजार घरे अल्प तर उर्वरित घरे मध्यम गटातील

- कल्याणमध्ये 2000 घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी

- गोठेघर, ठाणे – 1200 घरे

- वडवली येथे 20 घरे,

- कासारवडवल 350 घरे अल्प गटासाठी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.