बीडीडी पुनर्विकासात म्हाडाला दररोज एक कोटींचे नुकसान

बीडीडी पुनर्विकासात म्हाडाला दररोज एक कोटींचे नुकसान सोडतीमधील घरांवर पडणार प्रकल्पाचा बोजा MHADA loses Rs 1 crore per day in BDD redevelopment
Mhada-Home
Mhada-Homesakal
Updated on

सोडतीमधील घरांवर पडणार प्रकल्पाचा बोजा

मुंबई: शहरातील मध्यवर्ती ठिकाण आलेल्या बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे म्हाडाचे दररोज एक कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. या खर्चाचा बोजा रहिवाशांचे पुनर्वसन करून म्हाडा सोडतीसाठी निर्माण होणाऱ्या घरांवर टाकण्यात येणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या सोडतीमधील घरांच्या किंमती खाजगी विकसकांच्या प्रकल्पांप्रमाणे होणार होण्याची शक्यता आहे. (MHADA loses Rs 1 crore per day in BDD redevelopment)

Mhada-Home
अकरावी CETसाठी विद्यार्थ्यानी केली प्रश्नसंच देण्याची मागणी

वरळी, नायगाव, ना.म.जोशी मार्गावरील बीडीडी चाळींचा भूमिपूजन सोहळा 22 एप्रिल 2017 रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरळी येथील जांबोरी मैदानात झाले. या प्रकल्पासाठी सरकारने नोडल एजन्सी म्हणून म्हाडाची नेमणूक केली आहे. नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकासाचे काम एल ऍण्ड टी कंपनीला दिले आहे. ना.म.जोशी मार्गावरील चाळींच्या पुनर्विकासाचे काम शहापूरजी ऍण्ड पालनजी आणि वरळी येथील चाळींच्या पुनर्विकासासाठी टाटा कंपनीची निवड करण्यात आली आहे. भूमिपूजनानंतर गेली चार वर्ष पुनर्विकासाची प्रक्रिया धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंपन्यांना दरवर्षी कराराप्रमाणे दरवाढ द्यावी लागणार आहे. बांधकाम खर्चात दरवर्षी होणारी वाढ विचारात घेता सध्या म्हाडाला दरदिवशी सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचे म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Mhada-Home
कौशल्य विकास विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी जाहिरात, पण...

या प्रकल्पावर होणारा खर्च वाढल्यास त्याचा परिणाम सोडतीमधील घरांच्या किमतींवर होणार आहे. सध्या म्हाडाला या प्रकल्पासाठी एक कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प 2024 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र गेल्या चार वर्षात सॅम्पल फ्लॅट, काही रहिवाशांची पात्रता पूर्ण झाली असून अद्यापही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च सोडतीमधील घरांवर टाकला जाईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकल्पासाठी म्हाडाने एल अँड टी कंपनीला 2903 कोटी, शहापूरजी ऍण्ड पालनजी कंपनीला 2436 आणि टाटा समूहाला 11 हजार 744 कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. रहिवाशांनी या प्रकल्पाला सहकार्य न केल्यास म्हाडाला आणखी नुकसान होईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

(संपादन- विराज भागवत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()