सेवा शुल्काविरोधात म्हाडा वसाहतींचे एकीचे बळ; महासंघ स्थापनेची तयारी

MHADA
MHADASakal media
Updated on

मुंबई : शहर आणि उपनगरात असलेल्या म्हाडाच्या (mhada) 56 वसाहतींमधील (society) रहिवाशांना म्हाडाच्या मुंबई मंडळाने (Mumbai section) 1998 ते 2009 पर्यंतच्या थकीत सेवाशुल्कापोटी (service charge) वसाहतींना लाखो रुपयांची बिले धाडली आहेत. या शुल्काविरोधात सर्व म्हाडा वसाहतींनी (All mhada society) एकत्र येत महासंघ स्थापन करण्याच्या हालचाल सुरू केली आहे. त्यासाठी सर्व वसाहतींच्या रहिवाशांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MHADA
शिवसेनेतर्फे 'लसीकरणाची दहीहंडी' ; 35 हजार नागरिकांसाठी शिबिरे

मुंबई मंडळातंर्गत येणाऱ्या 56 वसाहतींना थकीत बिलासाठी लाखो रुपयांची बिले पाठविण्यात आली आहेत. वाढीव बिलांनी हजारो रहिवासी त्रस्त झाले असून म्हाडातील विविध वसाहती, गृहनिर्माण संस्थांनी त्याला विरोध दर्शविला आहे. म्हाडा मुंबई मंडळाने घेतलेल्या या निर्णयाविरोधात म्हाडाच्या 56 वसाहतीतील रहिवाशांनी वेगवेगळ्या स्तरावर विरोध करण्याऐवजी सांघिक स्वरुप देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी काळाचौकी येथील अभ्युदयनगर गृहनिर्माण संस्थांचा संघ, विक्रोळी कन्नमवार नगर सहकारी संस्थेने पुढाकार घेतला आहे. थकीत आणि वाढीव सेवा शुल्कास विरोध दर्शविण्यासाठी सर्वच वसाहतींचा महासंघ तयार केला जाणार आहे.

त्या महासंघात 56 वसाहतींतील पदाधिकारी, रहिवाशांचा समाविष्ट करुन त्यास आणखी व्यापक स्वरुप देण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्याचवेळी, म्हाडा अधिकाऱ्यांनी हा निर्णय राज्य सरकारच्या धोरणातंर्गत घेण्यात आल्याचा बचाव केला जात आहे. त्यामुळे, राज्य सरकारच्या धोरणात बदल होण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून हा प्रश्न अधिक तीव्रपणे मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी म्हाडा वसाहतींच्या प्रस्तावित महासंघात इतर सर्वच वसाहतींनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी संबंधितांनी नंदकुमार काटकर, 9833622961, सुरेश सरनोबत 9594803399 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.