"आव्हाडांनी दलालांना बंगल्यावर बोलावून उमेदवारांचे पैसे परत मिळवून द्यावेत"

आव्हाडांची विनंती न भूतो न भविष्यती; भाजप महिला मोर्चाने उडवली खिल्ली
sheetal gambhir desai
sheetal gambhir desaisakal media
Updated on

मुंबई : म्हाडाच्या परिक्षार्थी उमेदवारांकडून (Mhada Examinee) दलालांनी घेतलेले पैसे (Agents) परत करावेत, अशी राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दलालांना केलेली विनंती, न भूतो न भविष्यती, अशा स्वरुपाची आहे. आव्हाड यांनी उद्या या दलालांना आपल्या बंगल्यावर बोलावून हात जोडून विनंती करावी, अशा शब्दांत मुंबई भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष शीतल गंभीर देसाई (Sheetal Gambhir desai) यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे.

sheetal gambhir desai
मुंबई| अंंधेरीत 10 व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, 5 जण जखमी

म्हाडाच्या परिक्षांचे पेपर फुटल्याची चर्चा, त्यासाठी दलालांनी पैसे घेतल्याची कुजबूज, त्यानंतर दलालांनी हे पैसे उमेदवारांना परत देण्याची आव्हाड यांची विनंती व आता रविवारच्या म्हाडाच्या परिक्षाच रद्द करण्याचा आव्हाड यांचा निर्णय या साऱ्या प्रकरणावर श्रीमती देसाई यांनी टीकेची झोड उठवली आहे. स्व. आचार्य अत्रे यांच्या शब्दांत सांगायचे तर, दलालांना अशी विनंती करणारा आव्हाडांसारखा मंत्री पुढील दहा हजार वर्षांत होणार नाही, अशा शब्दात देसाई यांनी त्यांची टर उडवली आहे.

परिक्षार्थी उमेदवारांचे पैसे परत करण्यासाठी दलालांना हात जोडून विनंती यापूर्वी कोणा मंत्र्याने केली नव्हती व यापुढेही कोणी करेलसे वाटत नाही. आपल्या विनंतीचा मान ठेऊन राज्यातील किती व कोणत्या दलालांनी उमेदवारांना पैसे परत दिले याची आकडेवारीही आव्हाड यांनी उद्या पत्रकार परिषदेत जाहीर करावी. सोबत या दलालांचा सत्कारही करावा. दलालांनी पैसे परत न दिल्यास तुमचे आव्हान कोठे कमी पडले, अहिंसक मार्गाने केलेल्या विनंतीला कोणी दाद दिली नाही का, तुमचा वचक-धाक कमी झाला आहे का, दलाल मंडळी तुमचे आव्हान गांभीर्याने का घेत नाहीत, याचेही जरूर आत्मचिंतन करावे, असाही टोला देसाई यांनी आव्हाड यांना लगावला आहे.

आव्हाड यांच्याकडे आलेल्या तक्रारींनुसार काही उमेदवारांनी जमिनी, दागिने गहाण ठेऊन - विकून दलालांना पैसे दिले. म्हणजे आव्हाडांकडे त्या दलालांची पूर्ण माहिती आहे. अशा स्थितीत त्या दलालांना नम्रपणे, मान खाली घालून विनंती करण्याऐवजी त्या दलालांना अटक करावी व उमेदवारांचे पैसे परत मिळवून द्यावेत, असेही देसाई यांनी आव्हाड यांना सुनावले आहे. यापूर्वी एका मंत्र्याने विरोधी कार्यकर्त्यांना आपल्या बंगल्यावर आणून त्यांना मारझोड केल्याचा आरोप झाला होता. तसा कायदेभंग करण्याचा सल्ला मी अजिबात देणार नाही.

अशा बाबतीत काय करावे हे ठरविण्यात आव्हाड माझ्यापेक्षा तज्ञ आहेत. मात्र त्या दलालांना बंगल्यावर बोलावून, पैसे परत देण्याची नम्र विनंती आव्हाड करू शकतात. त्यांच्याकडून उमेदवारांचे पैसे परत मिळवून दिलेत तर त्या परिक्षार्थी उमेदवारांचे तसेच त्यांच्या कुटुंबियांचे आशिर्वाद आव्हाड यांना मिळतील, असा उपरोधिक सल्लाही देसाई यांनी दिला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.