मुंबई : सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (MHADA) आस्थापनेवरील विविध संवर्गातील 565 रिक्त पदांची (vacant post) भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांना (Eligible Candidates) 17 सप्टेंबर सकाळी 11 वाजेपासून ते 14 ऑक्टोबरला रात्री 23.59 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने (online Application) अर्ज भरता येणार आहेत.
म्हाडाच्या विविध मंडळातील रिक्त पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामावर परिणाम होत होता. अधिकारी, कर्मचाऱ्यांवर पडणारा ताण कमी करण्यासाठी म्हाडा प्राधिकरणाने रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विविध संवर्गातील एकूण 565 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य) 13 पदे, उप अभियंता (स्थापत्य) 13 पदे, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी 2 पदे, सहायक अभियंता (स्थापत्य) 30 पदे, सहाय्यक विधी सल्लागार 2 पदे, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 119 पदे, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक 6 पदे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 44 पदे, सहायक 18 पदे, वरिष्ठ लिपिक 73 पदे, कनिष्ठ लिपिक टंकलेखक 207 पदे, लघुटंकलेखक 20 पदे, भूमापक 11 पदे, अनुरेखकाच्या 7 पदांचा समावेश आहे.
या पदांचा सविस्तर तपशील, शैक्षणिक व अनुभवाची अर्हता, विहित वेतनश्रेणी, सामाजिक/समांतर/दिव्यांग आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, नियुक्तीच्या सर्वसाधारण अटी, शर्ती व प्रक्रिया, ऑनलाइन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क सादर करण्याबाबतच्या सूचना इत्यादी बाबत सविस्तर तपशील केवळ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर 17 सप्टेंबर सकाळी 11 वाजेपासून उपलब्ध राहील. पात्र उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करण्याकरता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर असलेल्या माहितीचे व सविस्तर जाहिरातीचे अवलोकन करावे, असे आवाहन म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी केले आहे. म्हाडा प्रशासनाने भरती प्रक्रियेसाठी कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व एजंट म्हणून नेमलेले नाही. भरती प्रक्रियेबाबत कोणत्याही अशा व्यक्तींशी परस्पर व्यवहार करू नये तसेच त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन ही सागर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.