काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत न्याय यात्रा आजपासून मणीपूर येथून सुरू होत आहे. यादरम्यान महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुपारी ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. देवरा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत आपण काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे स्पष्ट केलं. (Former Union minister Milind Deora quits Congress)
मिलिंद देवरा काँग्रेसचा हात सोडून लवकरच शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात काही दिवसांपासून सुरू आहे. अखेर आज सकाळीच मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. आपल्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षासी असलेले ५५ वर्षांचे नाते मी संपवत आहे असे मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे.
आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे. काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षाशी माझ्या कुटुंबाचे असलेले ५५ वर्षांचे नाते संपुष्टात आणले. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्ता यांचा वर्षानुवर्षे अखंड पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे, अशी पोस्ट देवरा यांनी एक्सवर केली आहे.
तिकीटाच्या आशा मावळल्या...
मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबई मतदारसंघातून खासदार राहिले आहेत, मात्र सध्या उद्धव ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत हे या मतदारसंघातून सध्या खासदार आहेत. तसेत आगामी लोकसभा निवडणूकीत देखील महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडून या जागेवर दावा सांगितला जात आहे. त्यामुळे देवरा यांना या जागेवर उमेदवारी मिळण्याच्या आशा मावळल्या आहेत. त्यामुळे देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
शिंदेंच्या शिवसेनेत होणार सामिल
काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर आता माजी खासदार मिलींद देवरा यांचा दुपारी २ वाजता वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिलींद देवरा ११ वाजता सिद्धीविनायकाचं सपत्नीक दर्शन घेऊन आपली भूमिका माध्यमांसोर स्पष्ट करतील असेही सांगण्यात आले आहे. त्यानंतर १० माजी नगरसेवक, २५ पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते हे वर्षा बंगल्यावर प्रवेशाकरता जातील असे सांगितले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.