शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आता शिवसेनेसह महाविकास आघाडी चांगलीच संकटात सापडली आहे. महाविकास आघाडी सरकारलाच या बंडामुळे धक्का पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या मदतीला मिलिंद नार्वेकर धावून आले आहे. ही परिस्थिती सावरण्याची जबाबदारी आता नार्वेकरांवर टाकण्यात आली आहे. (Milind Narvekar will become savior for Shivsena and uddhav thackeray)
कोण आहेत मिलिंद नार्वेकर?
गेल्या ३० वर्षांपासून नार्वेकर (Milind Narvekar) हे उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत. उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) ते विश्वासू सचिव असून दीर्घकाळपर्यंत त्यांनी ठाकरेंचे स्वीय सहाय्यक म्हणूनही कामगिरी बजावली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी ठाकरेंची धोरणं, पक्षाबाबतची रणनीती आखणं आणि ती यशस्वीपणे राबवणं ही कामं पार पाडली आहेत. एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) मनधरणीसाठी नार्वेकरांना पाठवणं याचं कारण म्हणजे शिंदे आणि नार्वेकर यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
शिंदे आता शिवसेनेत परतणार, त्यांच्या नाराजीचं पुढे काय, एकनाथ शिंदेंना आणखी महत्त्व मिळणार का अशा अनेक प्रश्नांची उत्तर नार्वेकरच देऊ शकतील. शिंदेंसोबतच्या बैठकीतही नार्वेकरांनी याच विषयांवर चर्चा केली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शिवसेनेसह शिंदेंचं भवितव्य नार्वेकरांच्या हातात असल्याचं सांगितलं जात आहे. आत्तापर्यंत शिवसेना सोडलेल्या आमदारांनी, नेत्यांनी नार्वेकरांविषयी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र शिंदेंच्या बाबतीत हे थोडं वेगळं आहे. त्यांनी अगदी मुख्यमंत्र्यांपासून संजय राऊतांपर्यंत सगळ्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पण त्यांनी नार्वेकरांबद्दल भाष्य केलेलं नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.