Milind Narvekar: मिलिंद नार्वेकरांचा विजय अन् मनसेने ठाकरेंना डिवचलं, नेमकं काय घडलं?

Milind Narvekar won: मिलिंद नार्वेकर यांच्या विजयानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. ठाकरे गटाने विचारमंथन सुरू केले आहे. काँग्रेसने नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची 7 मते दिल्याची माहिती आहे. त्यातील 2 मते फुटल्याचा ठाकरे गटाचा अंदाज आहे.
Milind Narvekar
Milind Narvekaresakal
Updated on

महाराष्ट्र विधान परिषद चुनावोंमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महायुतीचे सर्व 9 उमेदवार निवडून आले आहेत, तर महाविकास आघाडीला फक्त दोन जागांवर विजय मिळाला आहे. आज 12 जुलैला विधान परिषद निवडणुकीच्या 11 जागांसाठी मतदान संपन्न झाले. विधानसभा भवनात सकाळी 9 वाजता मतदान सुरू झाले आणि संध्याकाळी 4 वाजता समाप्त झाले. मतमोजणी संध्याकाळी 5 वाजता सुरू झाली.

महायुतीच्या विजयाचे अवलोकन

महायुतीच्या सर्व 9 उमेदवारांनी विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीच्या खात्यात फक्त 2 जागा गेल्या आहेत. या निवडणुकीत एकूण 12 उमेदवार होते. महायुती आणि महाविकास आघाडीने आपापल्या उमेदवारांच्या विजयासाठी जोरदार तयारी केली होती. निवडणुकीत महाविकास आघाडीतून कॉंग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी विजय मिळवला आहे तर ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकरही यशस्वी झाले आहेत.

मनसेची ठाकरेंवर टिका-

दरम्यान, मनसेचे संदीप देशपांडे यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. मिलिंद नार्वेकरांचा विजय हे त्यांचे वैयक्तिक श्रेय आहे. उगीचच त्याचे श्रेय कोणी घेण्याचा प्रयत्न करू नये, असे देशपांडे म्हणाले.

मिलिंद नार्वेकर यांच्या विजयानंतर ठाकरे गटाचा जल्लोष-

मिलिंद नार्वेकर यांच्या विजयानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. ठाकरे गटाने विचारमंथन सुरू केले आहे. काँग्रेसने नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची 7 मते दिल्याची माहिती आहे. त्यातील 2 मते फुटल्याचा ठाकरे गटाचा अंदाज आहे.

Milind Narvekar
MLC Election results 2024 : जयंत पाटील पराभूत! विधानपरिषदेचा निकाल जाहीर, मविआला मोठा धक्का

ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांची चर्चा-

मिलिंद नार्वेकर, अनिल परब, अनिल देसाई, वरुण सरदेसाई, सुनील प्रभू, विनायक राऊत यांच्यात चर्चा झाली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात बैठक झाली. विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना फोन करून शुभेच्छा दिल्या.

अनिल परबांचे अभिनंदन-

अनिल परब नार्वेकर यांच्या पाया पडले. अनिल परब, वरुण सरदेसाई, विनायक राऊत, अनिल देसाई, सुनील प्रभू यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. याबाबत नार्वेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Milind Narvekar
Sakal Survey 2024: काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन उद्धव ठाकरेंचं नुकसान झालंय का? मविआत सर्वाधिक फायदा कोणत्या पक्षाला?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()