कोरोनाची लागण झाल्यांनतर धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणतात...

कोरोनाची लागण झाल्यांनतर धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणतात...

Published on

मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा फटका महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि मंत्रालयाला देखील बसत आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. धनंजय मुंडे यांच्यासह 5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. धनंजय मुंडे यांच्यासह त्यांचे दोन स्वीयसहायक, मुंबईतील वाहन चालक, बीडचा स्वयंपाकी आणि बीडचा वाहनचालक अशा पाच जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. विशेष म्हणजे यापैकी कुणामध्येही कोरोनाची लक्षणं दिसून आली नव्हती.

मुंबईत आल्यानंतर धनंजय मुंडे आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्वांची करोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचे रिपोर्ट काल रात्री आले. यात धनंजय मुंडेंसह पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 

दरम्यान, या प्रकरणी स्वतः महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अधिक माहिती दिली आहे. राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. मी स्वतः धनंजय मुंडे यांच्याशी बोललो आहे, धनंजय मुंडे यांना मुंबईतील ब्रीच  कॅन्डी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात येणार आहे. मुंडे यांना श्वास घेताना थोडा त्रास जाणवत असला, तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं राजेश टोपे  यांनी सांगितलंय.

नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन कार्यक्रम पार पडला. याला देखील धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीला देखील धनंजय मुंडे उपस्थित होते. मात्र मंत्रिमंडळ बैठकीची सिस्टीम आता बदलली आहेत. आता सर्व मंत्री किमान दोन मीटर अंतर ठेऊन बसतात आणि तोंडावर मास्क देखील लावतात. त्यामुळे त्यांना हाय रिक्स कॉन्टॅक्ट बोलता येणार नाही. असंही राजेश टोपे म्हणालेत. 

धनंजय मुंडे यांनी सोमवारी बीड जिल्ह्यातील पहिल्या कोरोना तपासणी प्रयोगशाळेचे अंबाजोगाई येथे उदघाटन देखील केले होते. आता मुंडे यांना कोरोनाची लागण नेमकी कुठे झाली हे अद्याप स्पष्ट नाही. तसंच मुंडे यांच्यावर कुठे उपचार करण्यात येत आहेत याची माहिती मात्र मिळालेली नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेले धनंजय मुंडे हे तिसरे मंत्री आहेत. 

minister dhanjay munde will be shifted to mumbais breach candy hospital

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.