पूरग्रस्त भागातील विद्युत यंत्रणेचा आराखडा तयार करा, उर्जामंत्र्यांचे निर्देश

maharashtra flood
maharashtra floodsakal media
Updated on

मुंबई : राज्यातील पुरस्थितीचा (Maharashtra flood) विचार करता भविष्यात वीज यंत्रणा (electricity) कोलमडू नये यासाठी विद्युत यंत्रणेची उंची वाढविण्यासाठी आराखडा (electrical list) तयार करा. तसेच शक्य त्या उपाययोजनांची अंमलबजावणी तातडीने करा, अशा सूचना उर्जामंत्री डॅा. नितीन राऊत (Nitin raut) यांनी शुक्रवारी (ता. 30) महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. ( Minister nitin raut says make a list of electricity problems for future good services-nss91)

पुरग्रस्त भागातील नुकसानाची पाहणी करण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज सांगली जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पूरग्रस्त पलूस, वाळवा तालुक्यासह सांगली शहरात पाहणी केली. पुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या महावितरणच्या दुधगाव, कवठेपिरान, शेरीनाला येथील 33/11 केव्ही उपकेंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

maharashtra flood
Mumbai University: आयडॉलच्या बीकॉम परीक्षेचा निकाल जाहीर

महापुरामुळे सांगली शहरासह जिल्ह्यातील मिरज, शिराळा, वाळवा, पलूस या तालुक्याच्या भागात मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला. स्थानिक जनतेच्या घराघरांमध्ये पाणी शिरले. पूरग्रस्त परिसरामध्ये वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत उपकेंद्र, वीज वाहिन्या व रोहित्र यांचे प्राथमिक अंदाजानुसार 34 कोटी 68 लाख इतके नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली.

सांगली शहराचा वीजपुरवठा दोन दिवसात सुरळीत करण्यात आला. लोकांची पाण्याची गैरसोय दूर होण्यासाठी पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यास प्राधान्य दिले गेले. 29 जुलैपर्यंत एकूण बाधित घरगुती, वाणिज्य, औद्योगिक वर्गवारीत 67 हजार 628 ग्राहकांपैकी 65 हजार 734 वीजग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. उर्वरीत वीज ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्याचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मुख्य कार्यालय व प्रादेशिक कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्तरावर दुरुस्ती कार्य सुरू आहे. लवकरच सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.