मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या (Chief Minister) अध्यक्षतेखाली बँकांचे आणि रिझर्व बँकेचे प्रतिनिधी (RBI) यांची संयुक्त बैठक बोलावून उद्योजकांना (Businessman) बँकिंग क्षेत्रात (Banking sector) भेडसावणा-या समस्यांवर चर्चा करण्यात येईल, अशी हमी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी येथे दिली. ( minister Subhash desai on Businessman difficulties in banking sector jointly discussion with RBI-nss91)
महाराष्ट्र इंडस्ट्रीयल आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असोसिएशन आणि एसएमई चेंबर ऑफ इंडिया यांच्या एमआयडीसी (अंधेरी) येथील कार्यालयाचे शनिवारी उदघाटन करताना ते उद्योजकांसोबत बोलत होते. देसाई यांनी यावेळी या दोनही संस्था अधिक जोमाने वाटचाल करतील आणि लघु व मध्यम उद्योजकांना साह्य करण्यासाठी व त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी तत्पर राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
उद्योग क्षेत्रातील अशा संघटनांनी केंद्र आणि राज्य शासनामध्ये दूवा म्हणून कार्य केले पाहिजे. शासनाच्या विविध योजना लघु व मध्यम उद्योजकांपर्यत पोहचविल्या पाहिजेत. असे झाले तर या उद्योजकांचे बरेचसे प्रश्न सुटू शकतील. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बँकांचे आणि रिझर्व बँकेचे प्रतिनिधी यांची उद्योजक संघटनांबरोबर संयुक्त बैठक बोलावून उद्योजकांना बँकिंग क्षेत्रात भेडसावणा-या समस्यांवर चर्चा करण्यात येईल, अशी ग्वाही देखील देसाई यांनी उद्योजकांना दिली.
रायगडचे बल्क ड्रग पार्क
रायगड जिल्ह्यात होत असलेल्या बल्क ड्रग पार्क विषयी महाराष्ट्र शासन आणि एमआयडीसी आराखडा तयार करीत असून उद्योजकांच्या त्याविषयी काही सुचना असल्यास त्यांनी त्वरीत कळवाव्यात असे आवाहनही देसाई यांनी यावेळी केले. कोरोनाच्या काळात ई-कॉमर्स मुळे फुड प्रोसेसिंग क्षेत्रात प्रचंड मोठा वाव आणि संधी निर्माण झाल्या आहेत. राज्य शासनाने ठीकठिकाणी फुड पार्क सुरु केले आहेत. लघु व मध्यम उद्योजकांना जागा विकत घेवून त्यावर बांधकाम करून उद्योग सुरु करण्यात अनेक अडचणी येत आहेत.
त्यामुळे प्लग अँड प्ले योजनेनुसार सर्व सोयांनी युक्त असे संकुल एमआयडीसी उपलब्ध करून देणार आहे. तेथे उद्योजकांना त्वरीत उत्पादन सुरु करता येईल. यासाठी एसएमई चेंबरबरोबर सामंजस्य करार देखील करण्यात येईल असेही त्यांनी जाहीर केले. महाराष्ट्र इंडस्ट्रीयल अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असोसिएशन आणि एसएमई चेंबर ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांनी यावेळी उद्योजकांसमोरील समस्यांची माहिती दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.