Crime News: मुलावर आईच्या प्रियकराकडूनच अनैसर्गिक लैंगिक अत्याचार! गुन्ह्यात जन्मदातीही सामील

मुंबई पोलिसांनी मंगळवारी वर्षीय मुलाच्या आईला पोलिसांना अटक केली आहे
Crime News
Crime NewsEsakal
Updated on

मुंबईत 13 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार आणि छळ केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मंगळवारी एका 42 वर्षीय महिलेला अटक केली आहे. या महिलेच्या प्रियकराचा आणि तिच्या बहिणीचा पोलिस शोध घेत आहेत. जेव्हा या 13 वर्षांच्या मुलाने लैंगिक अत्याचाराचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचे हात आणि पायाला चटके दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी अटक केलेली ही महिला १३ वर्षीय अल्पवयीन मुलाची आई आहे. हा मुलगा आणि त्याची आई मुंबईच्या पूर्व उपनगरात राहतात. मुलाची आई एका खासगी रुग्णालयात काम करते. तिचा नवराही मुंबईत राहत होता आणि काही वर्षांपूर्वी तो त्याच्या मूळ गावी पुण्यात शिफ्ट झाला होता. वैवाहिक वादातून ही महिला पतीपासून विभक्त झाली होती. विभक्त होण्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांचा मुलगा तिच्या आईसोबत मुंबईच्या पूर्व उपनगरात राहत होता.

Crime News
Crime News:12 वर्षीय मुलीवर अत्याचार, रक्तबंबाळ अवस्थेत मदतीसाठी दारोदार जात होती पण...

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात इयत्ता 9वीत शिकणाऱ्या मुलाने आरोप केला आहे की, त्याची आई तिच्या पुरुष मित्रासोबत घरी दारूच्या नशेत होती. जेव्हा तिचा पुरुष मित्र या अल्पवयीन मुलावर अत्याचार करत असत तेव्हा प्रतिकार करण्यापासून रोखत असे. पुढे त्या मुलाने सांगितले की, जेव्हा तो या सर्व गोष्टींचा प्रतिकार करत तेव्हा त्याची आई त्याला चटके देत असे.

Crime News
Satara : शासकीय मेडिकल कॉलेजच्या भूमिपूजनाला ;शिंदे - फडणवीसांच्या तारखेची प्रतीक्षा

ही धक्कादायक घटना पाच वर्षांपूर्वी घडली आणि अलीकडेच ती समोर आली आहे. या घटनेने मुलाला मोठा धक्का बसला आणि आघात झाला आणि तो लोकांशी जास्त बोलायचा नाही. त्याच्या वडिलांनी अनेक वेळी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र, मुलगा काहीच बोलत नसे. त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याच्या शाळेच्या वह्या तपासण्यास सुरूवात केली. त्यांना त्यामध्ये काही गोष्टी आढळून आल्या.

त्यानंतर वडिलांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि घटना मुंबईत घडल्यामुळे त्यांनी मुंबईत येऊन मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ एफआयआर नोंदवून आईला अटक केली. या प्रकरणात तिचा प्रियकर आणि बहीण यांचा पोलिस तपास करत आहेत. महिलेला 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Crime News
निपाणीतील सख्ख्या भावांना कोल्हापुरातील चोरीप्रकरणी अटक; तब्बल 12 गुन्हे उघडकीस, 'इतक्या' लाखांचा मुद्देमाल जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.