Crime News : मुंबई : चेंबुर परिसरात पित्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मुंबईतील चेंबूर परिसरात एका पित्याने आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
molested by father
molested by fatheresakal
Updated on
Summary

मुंबईतील चेंबूर परिसरात एका पित्याने आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुंबई - मुंबईतील चेंबूर परिसरात एका पित्याने आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात 44 वर्षीय आरोपी पित्याविरुद्ध भादवि कलम 354, 506 आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 8, 12 आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या 37(1)(अ), 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे

आरोपी पित्याने अल्पवयीन मुलगी झोपलेली असताना तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. या घटनेनंतर पीडिता मानसिक तणावाखाली असल्याने तिने झोपेचे औषध घेतल्याने ती झोपी गेली. औषधामुळे पीडित मुलगी बेशुद्ध झाली, त्यानंतर तिला चंद्रा रुग्णालयात नेण्यात आले. मुलगी शुद्धीवर आल्यानंतर वडील तेथे आल्याचे तिने पाहिले. आरोपी पित्याने रुग्णालयात ती शुध्दीवर येताच पीडितेला चाकू दाखवून गप्प बसण्याची धमकी दिली.

आरोपी हे करत असताना तेथे उपस्थित डॉक्टरांनी त्याला पाहिले आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. आरोपी डॉक्टराना धक्काबुक्की करून घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेनंतर पीडित मुलीने संपूर्ण घटनेचा खुलासा केला आणि त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या जबाबाच्या आधारे तिच्या आरोपी वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आता आरोपी वडिलांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.