पेण हादरलं! अल्पवयीन मुलीवर दहा जणांकडून सामूहिक बलात्कार; सात जणांना अटक

Minor gang rape
Minor gang rapesakal media
Updated on

वडखळ/पेण : पेण तालुक्यातील (Pen vashi) वाशी सरेभाग येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर (Minor girl gang rape) दहापेक्षा अधिक जणांनी जीवे मारण्याची धमकी देत सामूहिक बलात्कार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रकरणात वडखळ पोलिसांनी सात जणांना (seven culprit arrested) अटक केली, तर तीन आरोपी अद्याप फरार आहे. दरम्यान, या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Minor gang rape
खारघर: दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त; पोटदुखीच्या रुग्‍णांत वाढ

गेल्या वर्षी मे महिन्यात वाशी परिसरात झालेल्या हळदी समारंभात पीडितेची एका तरुणासोबत ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि पुढे प्रेमात होऊन त्यांच्यात जवळिक वाढली. त्यांच्यातील शरीरसंबंधाची माहिती त्याच्या मित्रांना मिळताच त्यांनीही धमकावत पीडितेवर आळीपाळीने बलात्कार केला. मे २०२१ पासून सुरू असलेल्या या प्रकरणाची वाच्यता करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार करण्यात आले. पीडितेला फोन करून तिला बोलवून आरोपींकडून दररोज शरीरसंबंधाची मागणी केली जात होती. पीडितेला वारंवार कुणाचे फोन येतात, याबाबत पालकांनी विश्वासात घेत विचारपूस केली असता, अखेर हा प्रकार उघडकीस आला.

पीडितेच्या पालकांनी या प्रकरणी वडखळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपींना पकडण्यास सुरुवात केली. आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून त्यांना रविवारी सकाळी अलिबाग न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी तीन आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींची संख्या १५ पेक्षा अधिक असल्याची चर्चा असून जिल्हा पोलिस अधीक्षकांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम यांच्याकडे तपास सोपवला आहे.

Minor gang rape
Podcast: 1 फेब्रुवारीपासून मोठे बदल ते नाना पटोलेंच्या तोंडी गोडसेची भाषा?

बहुतांश आरोपी २० ते ३० वयोगटातील

अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी सहा जण २० ते ३० वयोगटातील असून एक जण ४० वर्षीय आहे. त्यापैकी काही जण सुरक्षारक्षक, तर काही मोलमजुरी करणारे आहेत. सर्व आरोपी वाशी परिसरातील असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

आरोपींना वाचवण्यासाठी नेत्यांची धडपड

सामूहिक बलात्काराचा प्रकार उघडकीस येताच जिल्ह्याभरात खळबळ उडाली. आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता आणि काही राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही पुढे आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.