Mira Road Murder: सरस्वती वैद्यच्या हत्येमध्ये कट-कारस्थान? तपास अधिकाऱ्याचा खळबळजनक खुलासा

मीरा रोड येथील सरस्वती वैद्य हत्याकांड प्रकरणी आणखी एक नवा खुलासा झाला आहे.
Mira Road Murder Case:
Mira Road Murder Case:esakal
Updated on

मुंबई : मीरा रोड येथील सरस्वती वैद्य हत्याकांड प्रकरणी आणखी एक नवा खुलासा झाला आहे. या हत्येसाठी प्रमुख आरोपी मनोज साने यांच्याकडून कट-कारस्थान रचलं गेल्याचा दावा तपास अधिकाऱ्यानं केला आहे. त्यामुळं यासाठी त्यानं काय गोष्टी केल्या याची माहितीही या अधिकाऱ्यानं दिली आहे. (Mira Road Murder planned Manoj Sane Bought Poison to Kill Wife Saraswati Vaidya Officers Claim )

Mira Road Murder Case:
Sharad Pawar: ऐतिहासिक काम 'त्या' जाहिरातीमुळं झालं! पवारांनी मारले शालीजोडे

प्राथमिक चौकशीदरम्यान, "आरोपी मनोज साने (वय ५६) यानं सांगितलं की, मी सरस्वतीला मारलं नाही. तीनं विष पिऊन आत्महत्या केली होती. ३ जून रोजी जेव्हा मी घरी परतो तेव्हा सरस्वती फरशीवर पडली होती. तिच्या तोंडातून फेसही येत होता. मी जेव्हा काय झालंय हे पाहिलं तेव्हा तीचा आधीच मृत्यू झाला होता. पण अटकेपासून बचावासाठी मी तिच्या शरिराचे तुकडे केले आणि त्याची विल्हेवाट लावली" (Latest Marathi News)

Mira Road Murder Case:
Uniform Civil Code: 'समान नागरी कायद्या'पेक्षा 'लोकसंख्या नियंत्रण कायदा' आणा; शरद पवारांनी मांडली भूमिका

पण त्याच्या विधानातच तफावत दिसत असून एकतर त्यानं तिला खाण्यातून थोडं थोडं विष दिलं असावं किंवा तिला विष पाजून मारलं असावं, असा दावा करताना आरोपी दिशाभूल करत असल्याचं म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.