Navi Mumbai News: घाटावरील नेत्याचे ‘मिशन नवी मुंबई’; 'या' कारणांसाठी आहे मतदारांवर जास्तीच लक्ष!

Mahrashtra Vidahnsabha Election News: दोन्ही बाजूंनी इच्छुकांची संख्या वाढलेली आहे. आपापल्या पक्षाकडे त्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Navi Mumbai mahapalika
Navi Mumbai mahapalika esakal
Updated on

Latest Panvel News: विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. कधीही आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यात विविध पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. संभाव्य आणि इच्छुक उमेदवारसुद्धा रात्रीचा दिवस करू लागले आहेत.

त्याचबरोबर मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल परिसरात असलेल्या आपल्या मतदारसंघातील मतदारांचे मेळावे, बैठका आणि विविध कार्यक्रम घाटाखाली घेतले जात आहेत. अनिल देसाई, दीपक साळुंखे, शशिकांत शिंदे, राणी लंके यांच्यासह इतर नेत्यांकडून चाकरमान्यांना आपलेसे करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत.

Navi Mumbai mahapalika
Navi Mumbai: अत्याचारानंतर व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर, ६ वर्षीय चिमुकलीसोबत जे घडलं ते ऐकून सारेच हादरले

लोकसभा निवडणुकीनंतर लागलीच अनेकांना विधानसभेचे वेध लागले. त्यानुसार महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. जागावाटपाच्या बैठका सुरू झाल्या आहेत. एका जागेवर दोन्ही बाजूंनी इच्छुकांची संख्या वाढलेली आहे. आपापल्या पक्षाकडे त्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

यासाठी वैयक्तिक, पक्षपातळीवर सर्व्हे करण्यात येत आहे. आपल्या मूळ मतदारसंघातील काही मतदार हे नोकरी- व्यवसायानिमित्त मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल परिसरामध्ये राहतात. त्यापैकी अनेकांचे मतदान आपल्या गावी असल्याने ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत ज्या निवडणुका होतात, त्यामध्ये हे चाकरमानी आणि मुंबईकर महत्त्वाची भूमिका बजावतात.

त्या पार्श्‍वभूमीवर पनवेल आणि नवी मुंबई परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मेळाव्यांचे सत्र आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. माण-खटाव या मतदारसंघातील मूळ रहिवासी मोठ्या संख्येने कळंबोलीसह कामोठे आणि पनवेल महापालिका क्षेत्रात वास्तव्य करतात. या मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे नेतृत्व करीत आहेत. त्यांच्याविरोधात शेखर गोरे यांनी मागील निवडणूक लढवली होती. सध्या ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत.

Navi Mumbai mahapalika
Navi Mumbai Crime: अमली पदार्थाची विक्री करणारे दोघे जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त!

या मतदारसंघात पुन्हा एकदा आपल्या भावाला भिडण्याची त्यांनी तयारी केली आहे; मात्र या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनसुद्धा दंड थोपटण्यात आले आहेत. येथे अनिल देसाई हे तुतारी चिन्हांकडून इच्छुक असून त्यांनी यासंदर्भात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. देसाई यांनी जिल्हा परिषदनिहाय मिळावे आणि बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.

त्याचबरोबर माण-खटाव येथील मूळ रहिवासी असणाऱ्या पनवेल आणि नवी मुंबईकरांची बैठक रविवारी कळंबोलीत घेण्यात आली. या वेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आपल्याला या निवडणुकीमध्ये संधी द्यावी, असे आवाहन देसाई यांनी केले. या मतदारसंघात माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुखसुद्धा इच्छुक आहेत. त्यामुळे नेमकी कोणाला उमेदवारी दिली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सांगोला मतदारसंघासाठी दीपक साळुंखे आग्रही

वाशी येथील सिडकोच्या एक्झिबिशन सेंटरमध्ये नवी मुंबई, पनवेल, मुंबई येथील सांगोलेकरांचा मेळावा नुकताच दीपक साळुंखे यांनी आयोजित केला होता. सांगोला मतदारसंघाचे विक्रमी वेळा गणपतराव देशमुख यांनी प्रतिनिधित्व केले. मागील निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून शहाजी पाटील हे निवडून आले. देशमुख यांचे नातू शेतकरी कामगार पक्षाकडून रिंगणात होते, त्यांचा पराभव झाला. २०२४च्या निवडणुकीत अजित पवार गटात सामील झालेल्या दीपक साळुंखे यांनी दंड थोपटले आहेत.

महायुतीमध्ये अजित पवार गट सहभागी आहे. एकनाथ शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील हे या ठिकाणचे विद्यमान आमदार आहेत. असे असताना साळुंखे या ठिकाणी निवडणूक लढवण्यात इच्छुक आहेत. त्यांच्या नवी मुंबईतील मेळाव्याला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

Navi Mumbai mahapalika
Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर लवकरच होणार पहिले ट्रायल लँडिंग, मोदींच्या हस्ते उद्घाटन? जाणून घ्या वैशिष्ट्ये

राम शिंदे यांच्या कार्यालयातून कॉल

आता घाटमाथ्यावरील विविध जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांकडून पनवेलसह नवी मुंबईकरांकडून संपर्क साधला जात आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील काही मतदार हे पनवेल परिसरामध्ये वास्तव्यास आहेत. या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे संभाव्य उमेदवार राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयातून मतदारयादीमध्ये असणाऱ्या व मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात राहात आहेत, त्यांना कॉल करून शहानिशा केली जात आहे.

राणी लंके यांचा सातत्याने संपर्क

पनवेल परिसरात विशेषता कामोठे येथे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील मूळ रहिवासी मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. नीलेश लंके खासदार झाल्यामुळे या मतदारसंघातून त्यांच्या पत्नी राणी लंके यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित आहे. लंके दाम्पत्य मुंबईस्थित पारनेरकरांशी सातत्याने संपर्कात असते. रायगड आणि नवी मुंबई परिसरातील सर्वाधिक रकमेच्या बक्षिसांची दहीहंडी लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून लावण्यात आली होती. यानिमित्ताने राणी लंके यांचे लॉन्चिंग करण्यात आले. मोठ्या प्रमाणात बॅनर, फलक आणि होर्डिंग प्रतिष्ठानच्या वतीने लावण्यात आले होते.

Navi Mumbai mahapalika
Navi Mumbai Crime : वाशीमध्ये रिक्षाच्या धडकेत पोलीस कॉन्स्टेबल जखमी

शशिकांत शिंदे यांचा मेळावा

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील रहिवाशांचा तसेच माथाडी कामगारांचा मेळावा आमदार शशिकांत शिंदे यांच्या वतीने रविवारी (ता. ६) माथाडी भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी शिंदे पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.

Navi Mumbai mahapalika
Navi Mumbai Crime: वकिलाचा प्रताप! तरुणीवर लैंगिक अत्याचार, व्हिडिओ शूट करून बड्या नेत्याला ब्लॅकमेल, उकळले 2 कोटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.