मुंबई: मिस्टर इंडियाचा (Mister India) किताब पटकवणारा प्रसिद्ध बॉडी बिल्डर मनोज पाटीलने (manoj patil) आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मनोज पाटीलने अभिनेता साहिल खानवर गंभीर आरोप केले आहेत. साहिल खानकडून (sahil khan) मानसिक त्रास दिला जात आहे. धमक्याही (Threaten) दिल्या जात असल्याचा आरोप मनोजने केले आहेत.
खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत असल्याचा आरोप मनोजने केला आहे. या प्रकरणी त्याने ओशिवरा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना लेखी पत्र लिहिले आहे. मनोजवर सध्या कुपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत
मनोजने सोशल मीडियावर एक ऑडियो पोस्ट केला आहे. त्रास आणि बदनामीला कंटाळून आत्महत्येचे पाऊल उचलत असल्याचे मनोजने आपल्या चिठ्ठीमध्ये लिहिले आहे. मिस्टर इंडियाचा किताब जिंकणारा मनोज मिस्टर ऑलिंपियासाठी प्रयत्न करत होता. साहिल खानला सुद्धा या स्पर्धेत उतरायचे होते. मी स्पर्धेत उतरु नये, यासाठी साहिल खान आपल्याला त्रास देत होता, असा आरोप मनोजने केला आहे.
साहिल खानने सोशल मीडियावर माझी बदनामी चालवली होती, असा आरोपही मनोजने केला आहे. या सगळ्याला कंटाळूनच आपण आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलत आहोत, असे त्याने चिठ्ठीत लिहिले आहे. मनोज पाटीलच्या कुटुंबाने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. मनोज पाटीलचे कुटुंब मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत असून ते मदतीची मागणी करणार आहेत. १९९२ साली जन्मलेल्या मनोजने २०१६ मध्ये मिस्टर इंडियाचा किताब जिंकला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.