पाया पडण्यास आला आणि कोरोना देऊन गेला; भावनातिरेक टाळण्याचे शिवसेना नेत्याचे आवाहन

पाया पडण्यास आला आणि कोरोना देऊन गेला; भावनातिरेक टाळण्याचे शिवसेना नेत्याचे आवाहन
Updated on

मुंबई : शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनाही कोरोनाविषाणूचा संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. पाया पडण्यासाठी आलेल्या कोणा कृतज्ञ उत्साही नागरिकामुळे मला संसर्ग झाला, त्यामुळे नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनीही भावनेच्या भरात सोशल डिस्टन्सिंगचे नियम तोडू नयेत, असे आवाहन सुर्वे यांनी केले. 

मंगेश कुडाळकर, अस्लम शेख यांच्यानंतर सुर्वे हे कोरोना झालेले मुंबईतील तिसरे आमदार आहेत. सुर्वे यांनी एरवीही संसर्ग होऊ नये यासाठी मास्क, हातमोजे, हेअरविग इ. काटेकोर काळजी घेतली होती. कार्यालयात नियमित बसत असल्याने कोणी जवळ येऊ नये म्हणून खुर्च्यांचे बॅरिकेड लावण्यात आले होते. मात्र तरीही भारावलेले काही उत्साही कृतज्ञ नागरिक त्यांच्या पाया पडत. अशाच एखाद्या प्रसंगातून आपल्यालाही संसर्ग झाला असावा अशी शक्यता सुर्वे यांनी व्यक्त केली. त्यामुळे सार्वजनिक जागी कोणीही भावनेच्या भरात वागू नये, आपल्याला व दुसऱ्यांनाही काहीही होणार नाही असा अतीआत्मविश्वास बाळगू नये. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आदी नियम पाळावेत, असेही सुर्वे यांनी सांगितले. गुरुवारी ताप आल्याने सुर्वे यांनी चाचणी करून घेतल्यावर ती पॉझिटीव्ह आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांची तब्येत चांगली आहे.

भाजप जिल्हाध्यक्षांकडून कोरोना रुग्णालयाची स्तुती
भाजपचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. आता त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झाली असून अंधेरीतील सेव्हन हिल्स या कोरोना रुग्णालयाच्या कामकाजाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. खणकर यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने गेले पंधरा-वीस दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर आता लौकरच ते घरी परतणार आहेत. कोरोना रुग्णालयांच्या कारभारावर एकंदर टीका होत असली तरी येथील व्यवस्थेवर खणकर यांनी समाधान व्यक्त केले.

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.