MUMBAI : मेट्रो-3 प्रकल्पाचे 97 टक्के भुयारीकरण पूर्ण

महालक्ष्मी मेट्रो स्थानकावर भुयारीकरणाचा 40वा टप्पा पूर्ण
Mumbai Metro
Mumbai Metrosakal media
Updated on

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे (MMRC) राबविण्यात येत असलेल्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-3 मार्गावरील (Mumbai metro) महालक्ष्मी मेट्रो स्थानकावर (mahalaxmi railway station) भुयारीकरणाचा 40वा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. तानसा-1 या रॉबिन्स बनावटीच्या टनेल बोरिंग मशीनद्वारे सायन्स म्यूझियम मेट्रो स्थानक ते महालक्ष्मी मेट्रो स्थानक हा डाऊन-लाईन मार्गाचा 1135.5 मी. भुयारीकरणाचा (underground work) टप्पा एकूण 757 रिंग्सच्या साहाय्याने 325 दिवसात पूर्ण करण्यात आला. यामुळे मेट्रो 3 मार्गाचे भुयारीकरणाचे (Mumbai metro 3) 97 टक्के काम पूर्ण झाले आहे. (MMRC-Mumbai metro-mahalaxmi railway station-underground work-Mumbai metro 3-nss91)

Mumbai Metro
कोविडच्या निर्बंध शिथिलतेनंतर मुंबईकरांची पुढचे २८ दिवस परीक्षा

मेट्रो-3 मार्गिकेतील पॅकेज-3 मध्ये पाच स्थानके असून हा या मार्गिकेतील सर्वात लांब टप्पा आहे. यामध्ये मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्यूझियम, आचार्य अत्रे चौक आणि वरळी मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. आतापर्यंत या पॅकेज अंतर्गत चार भुयारीकरणाचे टप्पे पूर्ण झाले आहेत. सायन्स म्युझियम ते महालक्ष्मी स्थानका दरम्यान भुयारीकरण करणे अतिशय आव्हानात्मक होते. या टप्प्यातील भुयारीकरण पश्चिम रेल्वे मार्गावरील महालक्ष्मी आणि लोअर परेल रेल्वे स्थानकांच्या दरम्यान थेट रेल्वेमार्गाच्या खालून करण्यात आले आहे.

याशिवाय हे बोगदे जेकब सर्कल येथील महानगर पालिकेच्या 17 मीटर खोल पंपिंग स्टेशनच्या जवळ आहेत. त्यामुळे येथे भुयारीकरण करणे जिकिरीचे होते मात्र हे शिवधनुष्य आमच्या टीमने यशस्वीरीत्या पेलले आहे. असे एमएमआरसीचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी सांगितले.मेट्रो-3 प्रकल्पाचे आतापर्यंत एकूण 53 कीमी म्हणजेच 97टक्के भुयारीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न एमएमआरसीकडून सुरु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()