Mumbai Metro : मेट्रो २बचे ५० टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण; मंडाले ते डीएननगर प्रवासाचा वेळ घटणार

सध्यस्थितीत मेट्रो मार्ग २ ब ची ५१.६३ टक्के भौतिक प्रगती पूर्ण झाली असून सर्व कामे प्रगतीपथावर
metro MMRDA Mumbai
metro MMRDA Mumbaisakal
Updated on

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सुविधा सुधारावी तसेच, वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करत नोकरदार वर्ग, महिला, विद्यार्थी यांना वेळेत आपल्या स्थानावर पोहोचवण्यासाठी एमएमआरडीएमार्फत मुंबई शहर आणि उपनगरत मेट्रो प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत.

त्यापैकीच एक डी एन नगर ते मंडाळे दरम्यान २३.६४ किमी लांबीच्या मेट्रो मार्ग २ब ची ५१ टक्के कामे पूर्ण झाली असून इतर कामेही प्रगतीपथावर आहेत. एमएमआरडीएच्या मेट्रो टीमने चेंबूर येथील मुंबई मेट्रो मार्ग २बच्या पॅकेज सीमध्ये १०२ पिअर कॅपची उभारणी पूर्ण केली आहे.

या मर्गिकेची कामे ३ पॅकेज मध्ये सुरू आहे. जून आणि जुलै महिन्यात भर पावसात ३३ पियर्स तसेच २३ पियर कॅप्सची उभारणी करण्यात टीम यशस्वी ठरली. आत्तापर्यंत या मर्गिकेतील ८३९ पैकी ४५० पियर कॅप्स ची उभारणी पूर्ण झाली आहे.

सध्यस्थितीत मेट्रो मार्ग २ ब ची ५१.६३ टक्के भौतिक प्रगती पूर्ण झाली असून सर्व कामे प्रगतीपथावर आहेत. मुंबई महानगर प्रदेश (MMRDA)ने अंदाज वर्तवला आहे की, २०३१ मध्ये दररोज १०.५ लाख प्रवासी या मार्गिकेवरून प्रवास करतील. तसेच, रस्त्याची स्थिती लक्षात घेता प्रवासाचा वेळ देखील ५०% ते ७५% ने वाचणार आहे.

मोनोच्या वरून मेट्रो धावणार

सध्या कार्यरत असलेल्या वाशी नाका, चेंबूर येथे मोनोरेलच्या ट्रॅकवरून मेट्रो लाईन २बचा गर्डर टाकण्यात एमएमआरडीएने यश मिळवले आहे. हा यू गर्डर लाँच करणे महत्त्वाचे होते. कारण त्याच्या लॉन्चिंगनंतरच हे सुनिश्चित झाले की, मेट्रो २बच्या गर्डरमुळे कार्यरत मोनोरेल मार्गाला कोणतेही नुकसान किंवा धोका होणार नाही.

वैशिट्यपूर्ण मंडाले डेपो

ट्रो २ब साठी मंडाले येथे 'डी. एन. नगर ते मंडाले' या ३३.७ किमी मार्गिकेसाठी मंडाले येथे ७२ रेक असणारा डेपो उभारला जात आहे. या तीन मजली इमारतीत जवळपास ३१ हेक्टर जागेत उभारले जात असलेल्या या डेपोचे पहिल्या टप्प्यातील ९६ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. तर १८ स्टेबलिंग लाईनचे काम पूर्ण झाले आहे.

या डेपोमध्ये सर्व गाड्यांमधील फेरबदल, सर्व किरकोळ वेळापत्रक आणि दुरुस्ती, अवजड उपकरणे बदलण्यासाठी लिफ्टिंग आणि चाचणी, अवजड उपकरणांची दुरुस्ती यासह सर्व तांत्रिक सुविधा उपलब्ध असतील. तर याच भागातील तीन मजल्यांच्या सिम्युलेटर इमारतीची १०० टक्के बांधणी पूर्ण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.