मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) मोनो रेलला (mono rail) नवसंजीवनी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एमएमआरडीएने 10 मोनो रेल गाड्या खरेदीसाठी (purchasing ten rail) करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी मागविण्यात आलेल्या निविदा (tender) प्रक्रियेत मेधा सर्वो डिवाइस प्रा. लि. या कंपनीला काम देण्यात आले आहे. जानेवारी 2023 मध्ये पहिली गाडी मोनोच्या ताफ्यात दाखल होणार असून अखेरची गाडी जानेवारी 2024 मध्ये दाखल होईल. या गाड्या दाखल झाल्यानंतर मोनो दर 5 मिनिटांनी धावू शकणार आहे.
एमएमआरडीएने चेंबूर ते जेकब सर्कल असा 20 किमीचा मोनो मार्ग सुरू केला आहे. मोनो प्रवासाकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याने हा प्रकल्प तोट्यात सुरु आहे. एमएमआरडीएने केलेल्या सर्वेक्षणात 2031 पर्यंत या मार्गावरून दीड लाख प्रवाशी प्रवास करण्याची अंदाज व्यक्त केला आहे. तर 2041 पर्यंत 3 लाख प्रवाशी प्रवास करतील असा अंदाज आहे. गाड्यांअभावी सध्या या मार्गावर ला गाडी 18 मिनिटांनी धावत आहे. हे अंतर कमी करून प्रवाशांना वेगवान सुविधा देण्यासाठी एमएमआरडीएने गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 2019 मध्ये गाड्या खरेदीसाठी निविदा काढण्यात आल्या.
या निविदा प्रक्रियेत दोन चिनी कंपन्या सहभागी झाल्या. मात्र या कंपन्यांनी अनेक अटी-शर्थी घातल्याने एमएमआरडीएच्या अडचणी वाढल्या होत्या. याच दरम्यान भारत आणि चीन मध्ये तणाव निर्माण झाल्याने देशभरात चिनी मालासह चिनी कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरु झाली. यातूनच जूनमध्ये एमएमआरडीएनेही चिनी कंपन्यांना कंत्राट न देण्याचा निर्णय घेत निविदाच रद्द केली. यानंतर मागविण्यात आलेल्या निविदांना चांगला प्रतिसाद लाभला. यामध्ये मेधा सर्वो डिवाइस प्रा. लि. या कंपनीला काम देण्यात आले आहे. हे काम 590 कोटींचे आहे. कंपनीने नियोजित वेळेत गाड्या पुरविल्यास मोनो मार्गावर दर पाच मिनिटांनी गाडी धावणे शक्य होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.