मुंबई: लॉकडाऊनदरम्यान मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) रखडलेल्या प्रकल्पांना पुन्हा गती देण्यात आली आहे. यामध्ये सहा मेट्रो मार्गिका, मुंबई पारबंदर प्रकल्प आणि उड्डाणपूल या कामांचा समावेश आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच असल्यामुळे केंद्र सरकारने देशातील लॉकडाऊन आणखी वाढवला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यावर एमएमआरडीए प्रकल्पांच्या कामाला अंशत: स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाचा प्रभाव नसलेल्या भागांत काम करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत सहा मेट्रो मार्गिका, मुंबई पारबंदर प्रकल्प, उड्डाणपूल आदी प्रकल्पांची कामे सुरू झाली.
डी. एन. नगर ते मंडाले या 23.63 किलोमीटरच्या मेट्रो-2 बी उन्नत मार्गिकेवर गर्डरच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. या मार्गावर 22 स्थानके असून, 10,986 कोटी रुपये खर्च येणार आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यावर एमएमआरडीएने 11 हजार मजुरांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था केली. त्यामुळे त्यांना मूळ गावी पुन्हा जाण्यापासून रोखण्यात यश आले. आता या मजुरांच्या बळावर एमएमआरडीएने पुन्हा कामे सुरू केली आहेत. पावसाळापूर्व कामांनाही सुरुवात झाली आहे.
इंटरचेंज सोय
मेट्रो-2 मार्गिकेला इंटरचेंज सुविधा असेल. ही मार्गिका घाटकोपर ते वर्सोवा या मेट्रो-1 मार्गिकेला डी. एन. नगर येथे, कुलाबा ते सीप्झ मेट्रो-3 मार्गिकेला बीकेसी येथे, मोनोरेलला चेंबूर येथे आणि मेट्रो-4 मार्गिकेला पूर्व द्रुतगती महामार्गावर जोडली जाणार आहे.
MMRDA's stalled projects Work on Metro Corridor, Parbandar, flyovers started
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.