Mumbai News : परळ वर्कशॉप बंद करण्याच्या निर्णयाविरोधात मनसे आक्रमक

सीएसएमटी येथील कार्यालयात धडक मोर्चा !
MNS aggressive against decision to close Paral workshop march at CSMT office
MNS aggressive against decision to close Paral workshop march at CSMT officeesakal
Updated on

मुंबई : परळ वर्कशॉप बंद करण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचा शुक्रवारी मध्य रेल्वेच्या सीएसएमटी येथील कार्यालयात धडक मोर्चा काढण्यात आला होता. परळ वर्कशॉप अचानक बंद करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे आणि हे महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना कदापी सहन करणार नाही.

त्यामुळे रेल्वेने घेतलेल्या निर्णय तात्काळ मागे घ्यावात, अन्यथा वेळ प्रसंगी रेल चक्का सुद्धा जाम करू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी दिला.

परळ कारखाना बंद करून त्या जागेवर प्रवासी टर्मिनस उभारण्यासाठी वर्षानुवर्षे कारखान्यात काम करीत असलेल्या कामगारांना विश्वासात न घेता प्रशासनाकडून कारखान्यातील काम आणि कामगार यांना इतर कारखान्यात पाठविण्यासाठी पत्र प्रसिद्ध करण्यात आली होती.

MNS aggressive against decision to close Paral workshop march at CSMT office
Mumbai Rain Update : पाऊस लांबल्यामुळे मुंबईत उद्यापासून १० टक्के पाणीकपात

तसेच पुढील एक वर्षात कारखाना बंद करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. त्याविरोधात महाव्यवस्थापक मध्य रेल्वे कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांची भेट घेवून कारखाना बंद करण्यास कामगार आणि महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचा विरोध असून

MNS aggressive against decision to close Paral workshop march at CSMT office
Mumbai Traffic Update : पावसामुळे मुंबईकरांची दैना! पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

सदर निर्णय मागे घेण्यात यावा तसेच कारखाना सुरु ठेवण्यासाठी काम वाढविण्यात यावे अशी मागणी केली असून महाव्यवस्थापक,मध्य रेल्वे यांनी तीन महिन्याचा कालावधी मागितला असून त्यावर सकारात्मक भूमिका घेण्यात येईल असे आश्वासन दिले असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.