MNS Answer to Uddhav Thacekray: 'बिनशर्ट पाठिंबा' अशी बोचरी टीका करणाऱ्या ठाकरेंना मनसेचं प्रत्युत्तर! म्हटलं, कपडे देखील...

MNS: शिवसेना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी या पाठिंब्यावरुन राज ठाकरेंवर 'बिनशर्ट पाठिंबा' असं संबोधत सडकून टीका केली.
Raj Thackeray vs Uddhav Thackeray
Raj Thackeray vs Uddhav Thackerayesakal
Updated on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर लोकसभा निवडणुकीसाठी बिनशर्त पाठिंबा दिला होता. शिवसेना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी या पाठिंब्यावरुन राज ठाकरेंवर 'बिनशर्ट पाठिंबा' असं संबोधत सडकून टीका केली. या टीकेवर आता मनसेनं प्रत्युत्तर दिलं आहे. (MNS Answer to Uddhav Thackeray who criticized Raj Thackeray as unshirted support)

Raj Thackeray vs Uddhav Thackeray
Vande Bharat Cockroach: 'वंदे भारत' प्रिमियम ट्रेनमध्ये जेवणात आढळलं झुरळ! प्रवाशानं थेट अश्विनी वैष्णव यांच्याकडं केली तक्रार

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

19 जून रोजी षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, "या निवडणुकीत आपलं कोण आणि परकं कोण? हे स्पष्ट झालं आहे. फक्त उद्धव ठाकरे नको म्हणून काही लोकांनी भाजपला 'बिनशर्ट' पाठिंबा दिला"

Raj Thackeray vs Uddhav Thackeray
MNS VS BJP: 'पृथ्वीवरचा सर्वात मोठा पक्ष ह्या ३१ वर्षाच्या तरुणावर तुटून पडलाय', मनसेचं भाजपला प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंच्या टीकेला मनसेचं प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंच्या मनसेवरील टीकेवर आता मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी प्रत्युतर दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, "हिरव्या मतांनी थोडाबहुत विजय संपादित केलेल्या लोकांना पाणचट जोक मारायची सवय झाली आहे, ती अद्याप गेलेली नाही. यापूर्वी कोरोनातही ते अशाच स्वरुपाचे जोक मारायचे.

पण एक नक्की सांगतो येणाऱ्या विधानसभेत या पाणचट जोक मारणाऱ्यांचे लोक कपडे देखील शाबूत ठेवणार नाहीत. मराठी माणसांनी त्यांना यावेळी मतदान केलं नाही. जे काही मतदान झालं ते हिरवं मतदान झालं, जो काही विजय झाला तो हिरवा विजय झाला"

Raj Thackeray vs Uddhav Thackeray
Fursungi Water Tanker: पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

उद्धव ठाकरेंच्या विरोधाचा काही संबंधच येत नाही. तुम्ही हिंदुत्व सोडलं आम्ही सोडलेलं नाही. आम्ही हिंदुत्वाच्या बाजूनं होतो, देशाच्या हिताच्या दृष्टीकोनातून आम्ही पाठिंबा दिला होता. उद्धव ठाकरे कदाचित हे विसरले असतील की ज्यावेळी ठाण्यात त्यांची सत्ता बसायची होती त्यावेळी आम्ही त्यांना देखील बिनशर्त पाठिंबा दिला होता.

दुसऱ्यांचे नगरसेवक चोरणाऱ्यांना बिनशर्त पाठिंब्याची किंमत काय कळणार आहे. सतत आयुष्यात यांनी चोरीच केली. याचे नगरसेवक चोर त्याचे नगरसेवक चोर आणि आता स्वतःवर वेळ आली की रडत बसायचं, असंही देशपांडे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.