मुंबई, ता. 25 : वाढीव वीज बिलाच्या मुद्यावर आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यभर आज धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. आज मुंबईत वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून मनसे नेते बाळा नांदगावकर या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. मनसेच्या या मोर्चा ला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही.
दरम्यान, आज होणाऱ्या मोर्चात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे सहभागी होणार नसल्याचे कळते. आज सकाळी 11 वाजता वांद्रे येथील राजयोग हॉटेल ते मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मनसेचे सर्व प्रमुख नेते तसेच पदाधिकारी सहभागी होणार आहेत. मनसेच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. मनसे मात्र मोर्चा काढण्यावर ठाम असल्याने पोलिस आणि मानासैनिकांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.
वाढीव विजबिलाच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक झाली असून वाढीव वीज बिलाबाबत सोमवारपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा राज्यात उग्र आंदोलन करु, असं अल्टिमेटम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलं होतं. मनसेच्या मागणीवर सरकारने काहीही निर्णय न घेतल्याने अखेर राज्यभर धडक मोर्चा काढण्यात येत असल्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
आता कोणतीही सूट देऊ शकणार नाही, असं ऊर्जामंत्र्यानी जाहीर केलं. ही महाराष्ट्राच्या साडे अकरा कोटी जनतेची फसवणूक आहे. श्रेयवादाच्या लढाईमुळे महाराष्ट्राच्या जनतेने का भोगायचं असा सवाल ही नांदगावकर यांनी विचारला.
महत्त्वाची बातमी : नुसती लुटालूट, ऑनलाईन बाजारात मास्कची चढ्या दरानेच विक्री
महाराष्ट्रातील एका ही घरातील वीज आम्ही कापू देणार नाही. वीज मंडळाचे लोक वीज कापण्यासाठी आले तर मनसैनिक रस्त्यावर उतरतील. यावेळी काही अनुचित घडलं तर याची जबाबदारी सरकारची असेल. सर्वसामान्यांची वीज कापणार असाल तर तुमचं वीज कनेक्शनही कापल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ही असं बाळा नांदगावकर यांनी दिला.
MNS to conduct marches to district collector offices on electricity bills issues
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.