मनसेनं फोडली IPLची बस; गुन्हा दाखल, चार जण ताब्यात

मनसेनं फोडली IPLची बस; गुन्हा दाखल, चार जण ताब्यात
Updated on

मुंबई: महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. त्यामुळेच स्थानिकांच्या मुद्यांवर मनसे ऍक्शन मोडवर आली आहे. या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असल्या तरी मनसे पूर्ण तयारी करत आहे. मनसेने काल रात्री आयपीएलची बस फोडली आहे. राज्यातील व्यावसायिकांना डावलल्याचा ठपका ठेवत ही खळखट्याक करण्यात आली आहे. खेळाडूंच्या वाहतुक व्यवस्थेचं काम मुंबईतील व्यावसायिकांना न दिल्यामुळे ही बस फोडण्यात आली आहे.

दिल्ली कॅपिटल या आयपीएल संघाच्या बसवर हल्ला केल्याप्रकरणी भारतीय दंडसंहितेच्या कलम 143,147,149,427 अंतर्गत 5 ते 6 अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितलं होतं. या प्रकरणी आता कुलाबा पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक शाखेचे उपाध्यक्ष प्रशांत गांधी यांच्यासह चार जणांना ताब्यात घेतले आहे. आणखी आरोपींचा शोध सुरू आहे.

मनसेनं फोडली IPLची बस; गुन्हा दाखल, चार जण ताब्यात
आजपासून १२ ते १४ वयोगटासाठी Corbevax लस; वृद्धांच्या तिसऱ्या लशीचा श्रीगणेशा

मुंबईतील व्यावसायिकांना हे कंत्राट मिळावं म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनेनं राज्य सरकार आणि आयपीएलला विनंती केली होती. मात्र, विनंती करुनही कंत्राट दिलं गेलं नाही, प्रतिसाद दिला गेला नाही, म्हणून मनसेची वाहतुक सेना आक्रमक झाल्याचं दिसून आलंय. या मागणीकडे आपलं लक्ष वेधण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी आयपीएल खेळाडूंसाठी असलेली बस फोडली आहे.

यावेळी आपली भूमिका मांडताना मनसेच्या वाहतुक सेनेचे पदाधिकारी म्हटलंय की, या प्रकरणी आम्ही सातत्याने महाराष्ट्रातील मंत्री आणि आयपीएलचे पदाधिकारी यांना निवेदन देऊन विनंती केली होती. मंत्री आदित्य ठाकरे यांनी मीटींगमध्ये राज्यातील व्यवसाय वाढेल, असं आश्वासन दिलं होतं मात्र, आताची सगळी कंत्राटे ही बाहेरच्या लोकांना देण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील वाहतुक व्यावसायिक सक्षम असतानाही ही कंत्राटे बाहेर का दिली? त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

मनसेनं फोडली IPLची बस; गुन्हा दाखल, चार जण ताब्यात
पंजाबचे २५ वे मुख्यमंत्री होणार भगवंत मान; आज होणार शपथविधी

हे कंत्राट महाराष्ट्रातील व्यावसायिकांना देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, आयपीएल व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केलं. तर दुसरकीडे, दिल्ली आणि इतर राज्यातील व्यावसायिकांना हे काम दिलं गेलं. त्यामुळे मनसेनं ही गाडी फोडली आहे. ताज हॉटेलसमोर ही आयपीएलची वोल्व्हो गाडी फोडण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.